मुंबई : दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी 'धडक' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. हा सिनेमा २० जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. जान्हवीसोबत या सिनेमात ईशान खट्टर हादेखील मोठ्या पडद्यावर पदार्पण करतोय... प्रेक्षकांसमोर येण्यासाठी 'धडक'ची टीम सज्ज झालीय... या सिनेमाचं प्रमोशनही मोठ्या धडाक्यात सुरू झालंय. जान्हवी आणि ईशानही या सिनेमाचं प्रमोशन करताना दिसत आहेत. दोघं आपल्या आगामी सिनेमासाठी रिअॅलिटी शोसोबतच देशातील अनेक शहरांत 'धडक'ला प्रमोट करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याच प्रमोशनचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर वायरल होतोय. यामध्ये जान्हवी कपूर 'झिंगाट' डान्स करताना दिसतेय. तिच्यासोबत ईशानही आहे. 



हा व्हिडिओ लखनऊमध्ये 'धडक'च्या प्रमोशनदरम्यान शुट करण्यात आला होता. दर्शकही जान्हवीला टाळ्यांनी प्रतिसाद आणि प्रोत्साहन देताना दिसत आहेत.


जान्हवी कपूरचा सिनेमा 'धडक' २०१७ मध्ये आलेल्या मराठी सिनेमा 'सैराट'चा रिमेक आहे. यूट्यूबवरही सिनेमातील 'झिंगाट' गाणं प्रदर्शित करण्यात आलंय. हे गाणंही आत्तापर्यंत २.५ करोडपेक्षाही जास्त वेळा पाहण्यात आलंय.