मुंबई : जान्हवी कपूरच्या प्रत्येक अभिनयाचं तिचे चाहते कौतुक करतात. कधी ती रिव्हलिंग ड्रेसमध्ये आकर्षक लूक दाखवताना दिसते. तर कधी तिचा किलर लूक चाहत्यांना भुरळ घालतो. पण अलीकडेच, अभिनेत्रीने असा मोनोकीनी ड्रेस परिधान केला होता. ज्याची किंमत ऐकून तुम्हाला शॉक बसेल.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जान्हवी कपूर तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत गुलाबी रंगाच्या मोनोकिनीमध्ये पूलसाईडवर मस्ती करताना दिसली. या लूकमध्ये अभिनेत्रीने अगदी लाईट मेक-अप केला होता. याचबरोबर हा लूक पूर्ण करण्यासाठी अभिनेत्रीने गोल्डन रंगाचे गोल आकाराचे कानातले घातले होते. ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत होती. जान्हवीने सोशल मीडियावर हा फोटो शेअर करताच हे फोटो व्हायरल होवू लागले. यासोबतच अभिनेत्रीच्या या छोट्या ड्रेसची किंमतही चर्चेत आली होती.


खर्च केले चक्क एवढे पैसे
तुम्हाला माहीत आहे का की, जान्हवी कपूरने या छोट्याशा मोनोकोनी ड्रेससाठी 19 हजार रुपये खर्च केले आहेत. ऑनलाईन शॉपिंग वेबसाइटवर या मोनोकोनीची किंमत $265 आहे, जी भारतीय किंमतीनुसार तुम्हाला 19,721 रुपयात मिळेल.



या फोटोंशिवाय जान्हवी कपूरने काही फोटोंमध्ये ट्रान्सपरंट टॉप घातल्याचं दिसतयं. फोटोमध्ये जान्हवीने पातळ ट्रांन्सपरंट क्रॉप टॉप घातलेला दिसत होता. ज्यामध्ये तिचे पिवळ्या रंगाचे अर्तवस्त्र स्पष्ट दिसत होते. या पारदर्शक टॉपसोबत जान्हवीने डेनिम शॉर्ट्स परिधान केलीये. याचबरोबर अभिनेत्रीने हलका मेकअप केला आहे. जान्हवीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.