मुंबई : हिंदी सिनेमामध्ये आजकाल स्त्री प्रधान सिनेमांची चालती आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'क्वीन', 'डियर जिंदगी','डियर माया' असे चित्रपट कमाल करून गेले. आता याच पठडीतील नवा चित्रपट 'जिया और जीया' रसिकांच्या भेटीला येतोय.  


'जिया' या नावाच्या दोन भूमिकांमध्ये कल्की कोचीन आणि रिचा चढढा दिसणार आहेत. त्यांचं चित्रपटातील नाव सारखेच आहे. पण त्यांचे स्वभाव अगदीच एकमेकींच्या विरोधी आहेत. 


कल्की कोचीन एका बिनधास्त मुलीची (जिया) व्यक्तिरेखा साकारत आहे तर रिचा संयमी (जीया) साकारत आहे. एका ट्रीपच्या दरम्यान त्यांची ओळख  होते आणि पुढे ही ट्रीप त्यांच्या आयुष्यात कोणते वळण घेते हे पाहण्यासाठी सिनेमाची वाट बघावी लागेल.



 


चित्रपटाचा टीझर फारच रिफ्रेशिंग आहे. पण रिचा आणि कल्कीची जोडी पडद्यावर किती धमाल करणार हे पाहण्यासाठी काही दिवस वाट पहावी लागेल.