जॉन आणि बिपाशाचं ९ वर्षानंतर एकमेकांपासून दूर जाणं खूप काही शिकवतं
जॉनचं ते ट्विट वाचल्यानंतर बिपाशाला धक्का बसला.
मुंबई : बॉलिवूड स्टार्सची अफेअर्स जुळायला आणि तुटायला फारसा वेळ लागत नाही, मात्र असे बरेच कपल्स आहेत जे कित्येक वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतरही विभक्त झाले आहेत. यापैकी एक नाव जॉन अब्राहम आणि बिपाशा बासू. जे जवळजवळ 9 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते आणि लग्नानंतर त्यांचं ब्रेकअप झालं. चला एक नजर टाकूया त्यांच्या लव्हस्टोरीवर
जॉनने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. मॉडेलिंगमध्ये यश मिळविल्यानंतर त्याने 2003 मध्ये आलेल्या 'जिस्म' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. गेल्या 15 वर्षांपासून तो बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. त्याच्या मॉडेलिंगच्या दिवसांत जॉनने बर्याच म्युझिक अल्बममध्ये काम केलं होतं, त्याच्या करिअरच्या कारकिर्दीमुळे त्याचं फॅनफोलोईंग देखील जबरदस्त आहे.
जॉन अब्राहमच्या जीवनात बिपाशा बासूची एन्ट्री, एक ट्विट आणि ब्रेकअप
मॉडेलिंगमध्ये नशीब आजमावल्यानंतर जॉनने 2003 मध्ये 'जिस्म'मधून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. या चित्रपटात जॉनसोबत बिपाशा बासू मुख्य भूमिकेत होती. दोघांनीही चित्रपटात अनेक हॉट सीन्स दिले. एक-एक करून दोघांनीही अनेक चित्रपटात एकत्र काम केलं. दोघांच्या अफेअर्सच्या किस्सेही बर्याच दिवसांपासून चर्चेत होते. एका मीडिया रिपोर्टनुसार जॉनने 2014 मध्ये न्यू इयर वर ट्विट केलं होतं. या ट्विटमध्ये त्याने असं लिहिले की, "यावर्षी आपल्या सगळ्यांच्या जीवनात प्रेम आणि आनंद येवो. "लव जॉन और प्रिया अब्राहम''
त्याने हे ट्विट चुकून केलं होतं. आणि यात त्याने आपल्या एनआरआय गर्लफ्रेंड प्रिया रांचलचे नाव लिहिलं. जॉनचे हे ट्विट वाचल्यानंतर बिपाशाला धक्का बसला. हे ट्विट पाहिल्यानंतर बिपाशाला खात्री पटली की, तो आपल्यासोबत प्रियाला देखील डेट करत आहे. तिला समजलं की जॉन तिची फसवणूक करत आहे. यानंतर दोघांचं ब्रेकअप झाले. मात्र, या दोघांनी याबद्दल कधीही उघडपणे काहीही सांगितलं नाही.
एका मुलाखतीत बिपाशा म्हणाली - "या धक्क्यातून बाहेर पडण्यासाठी मला बरेच महिने लागले." माझं आणि जॉनचं नातं तुटलंय यावर विश्वास ठेवणं मला कठीण होतं '. बिपाशा म्हणाली की, "मी जॉनमुळे लोकांशी संबध तोडले. मी माझा सर्व वेळ फक्त जॉनला द्यायचे. अगदी अनेक चित्रपट करणं देखील मी बंद केलं होतं. मात्र, आता आम्ही दोघंही भूतकाळ विसरून आपल्या आयुष्यात आनंदी आहोत''. बिपाशाने करण सिंह ग्रोव्हरशी लग्न केलं तर, जॉनने देखील प्रियासोबत लग्न केलं.