Marriage Proposal to Amber Heard: घटस्फोट आणि त्यानंतरच्या आरोप प्रत्यारोपांनंतर अखेर न्यायालयानं अभिनेता जॉनी डेप याला मोठा दिलासा दिला. जॉनी डेप आणि त्याची Ex Wife एम्बर हर्ड यांच्यामध्ये पडलेल्या वादाच्या ठिणगीचा न्यायालयात पोहोचेपर्यंत वणवा झाला. ज्यानंतर अखेर न्यायालयानं जॉनीच्या बाजूनं निकाल दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एम्बरकडून जॉनीला मोठी रक्कम देण्यात येण्याचेही निर्देश न्यायालयानं दिले. संपूर्ण जगाच्या नजरेत आलेल्या या नात्यात आता आणखी एका व्यक्तीची एंट्री झाली आहे. या व्यक्तीनं एम्बरलाही धक्का दिला. 


थेट लग्नाची मागणी 
जॉनी डेपसोबतच्या खटल्यामध्ये माघार घ्यावा लागलेल्या एम्बरला सौदी अरबच्या एका व्यक्तीनं लग्नाची मागणी घातली आहे. एम्बरच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर रेकॉर्डींग पाठवत या व्यक्तीनं वॉईस नोटच्या माध्यमातून हे प्रपोजल पाठवलं. 


ऑडिओ क्लीपमध्ये हा व्यक्ती जे काही बोलतोय त्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे. पाहा तो असं म्हणतोय तरी काय? (Johnny Depp ex wife Amber Heard got a proposal for  marriage)


'त्या म्हाताऱ्यापेक्षा मी बरा आहे, एम्बर. आता तुझ्यासाठी सर्व दारं बंद झाली आहे, तुझी काळजी घेण्यासाठी माझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही. मी पाहतोय की काहीजण तुला धमकावत आहेत, तुझा तिरस्कार करत आहेत. म्हणूनच मी तुझ्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. अल्लाहचे आशीर्वाद आपल्यावर राहोत... तूसुद्धा एक आशीर्वाद आहेत, पण तुला त्या नजरेतून पाहिलं जात नाही, मी त्याच्याहून (डेप) उत्तम आहे, माझा स्वीकार कर', असं तो व्यक्ती वॉईस नोटमध्ये म्हणाला. 



Bee4andafter_kw नावाच्या इन्स्टा अकाऊंटवरून ही वॉईस नोट ऐकायला मिळत आहे. त्या क्षणापासून एम्बरला लग्नाची मागणी घालणारी ही व्यक्ती कोण, असाच प्रश्न सर्वांनी उपस्थित केला.