Bra Thrown At Nick Jonas Video: अभिनेत्री प्रियंका चोप्राचा पती आणि प्रसिद्ध अमेरिकन गायक निक जोनसचा अमेरिकेत नुकताच एक कॉनसर्ट झाला. न्यू यॉर्कमधील यांकी स्टेडियमवर शनिवारी झालेल्या या कॉन्सर्टमध्ये निक जोनसबरोबर त्याचा भाऊ केविन जोनस, जो जोनसही सहभागी झाले होते. जोनस ब्रदर्स नावाने हा कॉन्सर्ट पार पडला. या कॉन्सर्टचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र व्हायरल झालेल्या या व्हिडीओंपैकी एका व्हिडीओमध्ये निक स्टेजवर गाणं गात असतानाच प्रेक्षकांमधून कोणीतरी एक ब्रा त्याच्या दिशेने भिरकावल्याचं दिसत आहे.


नक्की घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या चर्चेत असलेला हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील एका चाहत्यांच्या अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये निळ्या रंगाचं शर्ट आणि रस्ट रंगाची पॅण्ट घातलेला निक स्टेजवर गाणं गाताना दिसत आहे. तो प्रेक्षकांकडे पाहून गाणं गात असतानाच समोरच्या गर्दीमधून कोणीतरी एक काळ्या रंगाची ब्रा त्याच्या दिशेने भिरकावली. ही ब्रा निकच्या अगदी जवळ जाऊन पडली. गाणं गात असतानाच कोणीतरी ब्रा फेकल्यावर निकने अनोख्या पद्धतीने प्रतिक्रिया दिली.


निक जोनसने काय केलं?


अचानक समोरच्या गर्दीतून काहीतरी आपल्या दिशेने आल्याचं पाहून निक काही क्षण थांबला. ती ब्रा खाली पडल्यानंतर निकला आपल्या दिशेला फेकलेली गोष्ट काय आहे हे समजलं. त्यानंतर त्याने पुन्हा गाण्यास सुरुवात केली. त्यानंतर गाणं गात तो स्टेजच्या दुसऱ्या बाजूला गेला. अचानक ब्रा फेकल्याने निकने गाणं पूर्णपणे थांबवलं नाही आणि विनाअडथळा हा कॉन्सर्ट सुरु राहिला. "आजच्या कार्यक्रमातील निकचे काही फोटो. काही चाहत्यांनी त्याच्या दिशेने ब्रा फेकला. लोक कधी सुधरणार आणि कलाकारांना मान देणार? कलाकारांच्या दिशेने वस्तू फेकू नका," अशी कॅप्शनसहीत हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.



हा त्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा अपमान


"हे फारच अपमानकारक आहे. हा त्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा अपमान आहे. चाहत्यांनी कलाकारांचा सन्मान करायला शिकलं पाहिजे," असं एका चाहत्याने म्हटलं आहे. "स्वत:ला चाहता म्हणता आणि कलाकारच्या दिशेने ब्रा फेकता. हे फारच अपमानकारक आणि लज्जास्पद आहे," असं अन्य एकाने म्हटलं आहे. 


यापूर्वीही घडलेत असे प्रकार


अशाप्रकारे कलाकार परफॉर्म करत असताना त्यांच्या दिशेने वस्तू भिरकावल्या गेल्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही गायकांबरोबर अशा गोष्टी घडल्या आहेत. मागील काही वर्षांमध्ये अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. लाग वेगास शहरामध्ये झालेल्या एका कॉन्सर्टदरम्यान कार्डी बी या गायिकेच्या अंगावर एका चहात्याने कोल्ड ड्रींकचा कप फेकला होता. यामुळे संतापलेल्या या गायिकेने चाहत्याला माईक फेकून मारलेला.