मुंबई : भारताच्या विदेशी जावयाचे एक गाणे नुकताच प्रदर्शित झाले. या गाण्याने रसिक प्रेक्षकांच्या मनात वेगळेच स्थान निर्माण केले. 'सॉकर' असे या गण्याचे नाव आहेत. सॉकर गाण्यात जोनास बंधू - निक, केव्हिन आणि जो एकत्र दिसत आहेत. जोनस त्यांच्या पार्टनरसोबत एकत्र झळकत आहेत. प्रियंका चोप्रा, डॅनियल जोनास आणि सोफी टर्नर यांनीही गाण्यात भूमिका साकारली आहे. गाण्यात एकंदर 'हम साथ साथ हैं' सिनेमाचे दृश्य अनुभवायला मिळत आहे. या गाण्याच्या माध्यमातून जोनस कुटुंबाचा एक अनोखा अंदाज समोर आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


गाणे प्रदर्शित झाल्यानंतर प्रियंकाने स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून गाणे शूटिंग वेळेसचे तीन फोटो पोस्ट केले आहेत. एका फोटोमध्ये ती बाथटबमध्ये बसल्याचे दिसत असून दोन फोटोंमध्ये ती आणि पती निक एकत्र दिसत आहेत. 


 



शूटिंग दरम्यानचे फोटो पोस्ट करत प्रियंका कॅप्शन मध्ये म्हणते, 'जॉनस बंधू पुन्हा एकदा एकत्र आले आहेत.' असे म्हणत निकहा उत्तम पती असल्याचे तिने सांगितले आहे. जॉनस बंधूंच्या 'सॉकर' गाण्याने यूएस आयट्यून्स विक्री चार्टवर अव्वल स्थानी आपले नाव कोरले आहे.


प्रियंकाचा 'इजन्ट इट रोमॅंटिक' सिनेमा व्हॅलेंटाईन डेला प्रदर्शित करण्यात आला. यानंतर प्रियंका आता शोनाली बोस दिग्दर्शित 'द स्काय इज पिंक' सिनेमात फरहान अख्तर आणि झायरा वासीम सोबत झळकणार आहे.