मुंबई : निर्माती, दिग्दर्शक जोया अख्तरचा नुकताच प्रदर्शित झालेल्या रणवीर सिंह आणि आलिया भट्ट स्टारर 'गली बॉय' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला. प्रदर्शनाच्या कित्येक दिवसांनंतरही 'गली बॉय'च्या आकड्यात वाढ होत आहे. जोया अख्तर दिग्दर्शित 'गली बॉय' चित्रपट जोयाच्या कारकिर्दीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. 'गली बॉय' चित्रपटात रणवीरच्या वडीलांची भूमिका साकारणारे अभिनेता विजय राज पुन्हा एकदा जोया अख्तरसोबत काम करणार आहेत. जोयाच्या नवीन प्रोजेक्टसह विजय राज डिजीटल डेब्यू करणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिग्दर्शक जोया अख्तर आणि अभिनेता विजय राज ही जोडी लवकरच अॅमेझॉनच्या प्राइम व्हिडिओ ओरिजिनलच्या आगामी वेब-सीरीज 'मेड इन हेवन'मध्ये एकत्र काम करताना पाहायला मिळणार आहे. 'गली बॉय' चित्रपटातून आपल्या भूमिकेची वेगळी छाप उमटवणारा अभिनेता विजय राज आता जोया अख्तर आणि रीमा कागदी यांच्या आगामी वेब सीरीजमध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहेत. 



रीमा कागदीने जोया अख्तर, नित्या मेहरा, अलंकृता श्रीवास्वव आणि प्रशांत नायरसह लग्नातील विविध पैलू प्रदर्शित केले आहेत. 'मेड इन हेवन' या वेब सीरीजमध्ये वेडिंग प्लॅनर्सची गोष्ट सांगण्यात आली आहे. 'मेड इन हेवन'मध्ये श्वेता त्रिपाठी, पुलकित सम्राट, अमृता पुरी आणि मनजोत सिंह असे इतर कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना पाहयला मिळणार आहेत. 



'एक्सेल इंटरटेन्मेंट' या बॅनरखाली रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर या वेब सीरीजची निर्मिती करणार आहेत. जोया अख्तर आणि रीमा कागती दिग्दर्शित 'अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ ओरिजिनल'ची आगामी सीरीज येत्या 8 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.