मुंबई : ज्युनियर एनटीआर तेलगू चित्रपट उद्योगातील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. त्यांची ओळख आता राज्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. परदेशातही लोकं आता त्याला ओळखू लागले आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'RRR' या चित्रपटाने पडद्यावर जोरदार कमाई केलीये. तो त्याच्या प्रत्येक चित्रपटासाठी निर्मात्यांकडून भरमसाठ रक्कम घेतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडिया रिपोर्ट्सनुसार, Jr NTR ची एकूण संपत्ती 440 कोटी रुपये आहे. तो दक्षिणेतील सर्वाधिक मानधन घेणारा कलाकार आहे. एका चित्रपटासाठी तो 20 कोटी घेतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'RRR' चित्रपटासाठी त्याने 45 कोटी रुपये घेतले होते.


आलिशान घर


ज्युनियर एनटीआर हैदराबादच्या पॉश भागात असलेल्या जुबली हिल्समध्ये राहतो. त्याचे हे आलिशान घर सुमारे 25 कोटींचे आहे. त्याच्या या घरात सर्व सुखसोयी उपलब्ध आहेत. राम चरण, महेश बाबू, अल्लू अर्जुन यांसारखे साऊथ इंडस्ट्रीतील सर्व टॉपचे कलाकारही याच भागात राहतात. याशिवाय एनटीआर (ज्युनियर एनटीआर) याचे बंगळुरू, कर्नाटक आणि हैदराबाद सारख्या शहरांमध्येही घर आहे.
 
लक्झरी कारची आवड
 
ज्युनियर एनटीआरकडे रोल्स रॉयस, रेंज रोव्हर आणि ऑडी सारख्या अनेक लक्झरी वाहनांची मालकी आहे ज्यांची किंमत करोडो आहे. याशिवाय ज्युनियर एनटीआर चित्रपटांव्यतिरिक्त ब्रँड प्रमोशनमधूनही पैसे कमावतो. Oppo, Otto, Appy Fizz सारख्या कंपन्यांचे तो ब्रँड अॅम्बेसेडर देखील आहे. यातून त्याला चांगले उत्पन्न मिळते. 



मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याचे वार्षिक उत्पन्न 40 कोटी रुपये आहे. आलिशान घर आणि आलिशान वाहनांव्यतिरिक्त, ज्युनियर एनटीआरकडे एक खाजगी जेट देखील आहे ज्याची किंमत 80 कोटींपेक्षा जास्त आहे.