मुंबई : टॉलीवुड स्टार जुनिअर एनटीआर सध्या खूप चर्चेत आहे. फिल्म स्टारने काही दिवसांपूर्वी एक लक्झरी कार लम्बोर्गिनी उरुस ग्रेफाइट कॅप्सूल खरेदी केली आहे. ज्याची किंमत 3.16 कोटी असल्याचे सांगितले जात आहे. यासह, ही कार खरेदी करणारा तो पहिला भारतीय देखील बनला आहे. आता चर्चा आहे की, कारच्या नोंदणीसाठी त्याने 17 लाख रुपये खर्च केले आहेत. जुनिअर NTR ने या आलिशान कारसाठी 9999 हा क्रमांक घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जुनिअर एनटीआरने या विशेष क्रमांकासाठी ही मोठी रक्कम मोजली आहे. हा त्याचा आवडता क्रमांक आहे. हा विशेष क्रमांक मिळवण्यासाठी त्याने भरमसाठ रक्कम भरली. त्याच्या नवीन कारचा नंबर TS 09 FS 9999 आहे. अहवालांनुसार, जुनिअर एनटीआरला हा विशेष क्रमांक जवळच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) बोली दरम्यान मिळाला आहे.


JR.NTR च्या लक्झरी वाहनांच्या यादीत आणखी एक नोंद झाली आहे. यापूर्वी फिल्म स्टारजवळ 1.64 कोटी रुपयांची पोर्शे, 3.88 कोटी रुपयांची रेंज रोव्हर वोग, 77.17 लाख रुपयांची ऑडी क्यू 7, 88.18 लाख रुपयांची मर्सिडीज बेंझ जीएलएस 350 डी, 1.35 कोटी रुपयांची बीएमडब्ल्यू 720 एलडी आणि 35.02 रुपये लाख स्कोडा सुपर्ब सारखी लक्झरी वाहने आहेत.


जुनिअर एनटीआरच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात, तो स्टार राम चरण आणि बॉलिवूड स्टार अजय देवगण सोबत दिसणारे. या व्यतिरिक्त, चित्रपट स्टार कोरटल्ला शिवा सोबत पुढील चित्रपटात काम करत आहे.