Jr NTR Ram Mandir Consecration :  भारतातून अनेक लोकप्रिय सेलिब्रिटी यावेळी हजेरी लावणार आहेत. त्यात फक्त कलाकार नाही तर खेळाडू आणि राजकारणी देखील आहेत. दरम्यान, नुकतंच 'आरआरआर' स्टार ज्यूनियर एनटीआरला देखील निमंत्रण मिळालं होतं. मात्र, तो या सोहळ्यात हजर राहू शकणार नाही आहे. त्याचं कारण आता समोर आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'गुल्टे' च्या एका रिपोर्टनुसार, 'आरआरआर' स्टार ज्यूनियर एनटीआरला अयोध्याच्या राम मंदिरच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण मिळालं होतं. मात्र, तो त्यात सहभागी होऊ शकणार नाही. त्याचं कारण त्याचा आगामी चित्रपट आहे. त्याच्या 'देवारा' या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमुळे त्याला या सोहळ्याला मुकावं लागणार आहे. तर ज्युनियर एनटीआरचा हा चित्रपट 5 एप्रिल 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शनासाठी फक्त तीन महिने राहिले आहेत, असं वाटतं की ज्यूनियर एनटीआर आणि त्याच्या टीमला वेळ व्यर्थ घालवायचा नाही. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, ज्युनियर एनटीआर सध्या 'देवारा' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाची पटकथा ही कोराटाला शिवा यांनी लिहिली असून त्यांनीच दिग्दर्शन केलं आहे. 'देवारा' या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर सैफ अली खान, जान्हवी कपूर, शाइन टॉम चाको आणि अनेक दिग्गज कलाकार पाहायला मिळणार आहे. 'देवारा' या चित्रपटाची निर्मिती ही युवसाधा आर्ट्स आणि एनटीआर आर्ट्सनं तयार केलं आहे. 


हेही वाचा : औरंगाबादमध्ये चाहत्यांकडून लोकप्रिय अभिनेत्रीवर हल्ला, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण


ज्युनियर एनटीआरच्या कामाविषयी बोलायचे झाले तर 'देवारा' नंतर तो 'वॉर 2' वर काम करणार आहे. दरम्यान, असे म्हटले जाते की या चित्रपटात तो हृतिक रोशनच्या विरुद्ध भूमिका साकारणार आहे. अर्थात तो खलनायकाची भूमिका साकारणार आहे. तर यात किती सत्य आहे हे माहित नाही. आता जेव्हा त्याविषयी अधिकृत माहिती देण्यात येईल तेव्हा याविषयी स्पष्ट कळेल. 'वॉर 2' विषयी बोलायचे झाले तर हा चित्रपट YRF च्या स्पाय यूनिव्हर्सचा एक चित्रपट आहे. त्याचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद ऐवजी अयान मुखर्जी करणार आहे. 


कोणत्या कलाकारांना मिळालं निमंत्रण?


दाक्षिणात्या कलाकारांविषयी बोलायचे झाले तर चिरंजीवी, मोहनलाल, रजनीकांत, प्रभास, राम चरण, यश, धनुष आणि ऋषभ शेट्टी या कलाकारांना आमंत्रण पाठवण्यात आलं आहे. तर बॉलिवूडमध्ये दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, आलिया भट्ट, रणबीर कपूर, अजय देवगन, अक्षय कुमार सारख्या कलाकारांना देखील निमंत्रण पाठवण्यात आलं.