सेटवरच अमिर खाने तिचा हात धरला आणि... तब्बल 5 वर्ष जुही चावलाने धरला होता अबोला
Aamir Khan and Juhi Chawla: आमिर खान आणि जूही चावला यांनी अनेक चित्रपट एकत्र केले आहेत. त्यांची जोडीही अनेक प्रेक्षकांना आवडली होती. परंतु सेटवर आमिरनं जूहीसोबत असं काही केलं
Aamir Khan and Juhi Chawla: शाहरूख खान आणि जूही चावला यांची फारच चांगली मैत्री आहे. आर्यन खानच्या प्रकरणात जूही चावला हिनं चांगलीच मदत केली होती. परंतु तुम्ही माहितीये का की जुही चावला आणि आमिर खान यांच्यात फार मोठा वाद झाला होता आणि चक्क ते दोघं पाच वर्षे तरी एकमेकांशी बोलत नव्हते. आज जुही चावला हिचा वाढदिवस आहे. 90 च्या काळात जूही चावला ही लोकप्रिय अभिनेत्री होती. त्यातून माधूरी दीक्षित, दिव्या भारती, श्रीदेवी, करिश्मा कपूर यांच्यासोबत तगडी स्पर्धा असून सुद्धा जूही चावला यांनी स्वत:चे असे हक्काचे स्थान निर्माण केले होते. त्यामुळे जूही चावलाची जोरात चर्चा होती. आज ती चित्रपटसृष्टीत फारशी सक्रिय नसून तिची आताही चर्चा होताना दिसते. आमिर खान आणि जूही चावला यांच्यात नक्की कसला वाद होता.
सध्या जूही चावला ही तिच्या आगळ्यावेगळ्या भुमिका करताना पाहिल्या आहेत. आमिर खानही प्रचंड लोकप्रिय आहे. आमिर खानही लवकरच कमबॅक करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्याच्याही नव्या चित्रपटाची सर्वत्र जण आतुरतेनं वाट पाहत आहेत. यावेळी आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे आमिर खान आणि जूही चावला यांच्यात नक्की असं काय झालं होतं?
आमिर खान आणि जूही चावला हे खूप चांगले मित्र होते. तुम्ही त्यांचा 'हम है राही प्यार के' हा चित्रपट पाहिला असेलच. या चित्रपटातील त्या दोघांची केमेस्ट्री ही फारच जास्त लोकप्रिय आहे. त्याचसोबत त्यांनी अनेक चित्रपटांतून एकत्र कामं केली आहेत. परंतु आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तो म्हणजे 'इश्क' या सिनेमाच्या शुटिंगचा. या चित्रपटात आमिर आणि जूही हे एकत्र होते. त्यावेळी आमिर खाननं जूहीसोबत एक जोक शेअर केला होता. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली होती. मी भविष्य पाहतो तुझा हात दाखव असं आमिरनं जूहीला सांगितलं होतं.
तेव्हा जूहीला असं वाटलं की आमिर खान हा खरंच हे सर्व काही शिकला असेल. त्यानंतर जेव्हा जूहीनं त्याच्यापुढे आपला हात पुढे केला तेव्हा तो अक्षरक्ष: तिच्या हातावर थुंकला. हे सगळं जूहीला अजिबातच सहन झालं नाही. तिला आमिर खानसोबत राजा हिंदूस्थानी हा चित्रपटही ऑफर झाला होता जो तिनं करण्यास नाकारला होता. तिच्या ऐवजी या चित्रपटातून करिश्मा कपूर ही प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. आमिरनं गंमत म्हणून ही गोष्ट केली होती परंतु जूहीनं ते फारच मनाला लावून घेतलं होतं.