नवी दिल्ली : छोट्या पडद्यावरील ‘कुमकुम- एक प्यारा सा बंधन’ ही मालिका सुरु झाल्यानंतर बरीच लोकप्रिय झाली. एकता कपूरच्या या मालिकेतून जूही परमार ही अभिनेत्री अगदी घराघरांत पोहचली. ‘मिस राजस्थान’चा किताब पटकावणाऱ्या जुहीने २००९ मध्ये गुजराती व्यावसायिक आणि अभिनेता सचिन श्रॉफशी प्रेमविवाह केला. ‘पती पत्नी और वो’, ‘नच बलिये’ यांसारख्या रिअॅलिटी शोमध्ये दोघांनी एकत्र भाग घेतला आणि टेलिव्हिजनची ही जोडी सर्वांनाच आवडू लागली. परंतु, आठ वर्षे संसार केल्यानंतर ही जोडी आता विभक्त होण्याच्या वाटेवर आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार, हे दोघही मागील एक वर्षापासून वेगळे राहत आहेत. त्यानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. २००९ मध्ये जुही आणि सचिन विवाहबद्ध झाले होते. त्यांना ४ वर्षांची मुलगी देखील आहे. 



यापूर्वी देखील हे दोघे विभक्त होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु, त्यात काही तथ्य नसून त्या अफवा असल्याचे दोघांनी सांगितले होते. 



पुन्हा एकदा हे दोघ वेगळे होणार असल्याचे वृत्त कानी आले आहे. परंतु, त्याबद्दल दोघांकडूनही कोणतीही प्रतिक्रीया मिळू शकली नाही.