`जुळून येती रेशमीगाठी` मालिकेचा दुसरा भाग येणार? ललित प्रभाकरनं दिली हिंट; नेटकरी म्हणाले, `वाट पाहतोय`
Julun Yeti Reshimgathi Sequel: दहा वर्षांपुर्वी आलेल्या `जुळून येती रेशीमगाठी` या मालिकेची आजही तितकीच क्रेझ कायम आहे. आता या मालिकेचा दुसरा भाग येणार का याची जोरात चर्चा रंगलेली आहे. त्यात ललित प्रभाकरनं एक हिंट दिली आहे.
Julun Yeti Reshimgathi Sequel: मराठी मालिकांचा प्रेक्षकवर्ग हा प्रचंड मोठा आहे. 'झी मराठी' वाहिनीवरील 'जुळून येती रेशीमगाठी' ही मालिका आठवत असेलच. नुकतीच या मालिकेला 10 वर्षे पुर्ण झाली आहेत. ललित प्रभाकरनं याबाबतची एक पोस्ट शेअर केली आहे. 25 नोव्हेंबर रोजी या मालिकेचा पहिला एपिसोड प्रदर्शित झाला होता. मेघना आणि आदित्य यांची प्रेमकहाणी प्रेक्षकांना भावली होती. सोबतच देसाई कुटुंबाची गोष्टही प्रत्येकाला आपलीशी वाटत होती.
उदय टिकेकर म्हणजे बाबाजी यांची भुमिकाही प्रेक्षकांनी उचलून धरली होती. म्हणता म्हणता या मालिकेली एक दशक पुर्ण झालं आहे. त्यामुळे चाहत्यांना प्रचंड आनंद झाला असून तेही जुन्या आठवणींमध्ये रमले आहेत. यावेळी या मालिकेचा दुसरा भाग येणार का? याची चर्चा सुरू झाली आहे. यावेळी ललित प्रभाकरनंच हिंट दिली आहे.
ललित प्रभाकरचाही फार मोठा चाहतावर्ग आहे. 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेनंतर ललित प्रभाकर आणि प्राजक्ता माळी हे दोघंही आपल्या करिअरमध्ये खूप पुढे गेले आहेत. त्यांची जोडी आजही महाराष्ट्राची फेवरेट जोडी आहे. आता या मालिकेचा पुढील भाग आला तर नक्की मेघना आणि आदित्यच्या आयुष्यात काय घडणार यावरही चाहत्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. ललित प्रभाकर आणि प्राजक्ता माळी हे दोघंही सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय आहेत. मालिकेच्या दशकपुर्ती निमित्त त्यांनी सोशल मीडियावर आपल्या दोघांचा एक क्यूट व्हिडीओ हा शेअर केला आहे. ज्यातून पुन्हा आदित्य मेघना आपल्या समोर आले आहेत असा भासच प्रेक्षकांना होतो आहे. यावेळी प्राजक्तानं सुंदर साडी नेसली आहे तर ललित हा कॅज्युअल वेअरमध्ये आहे.
हेही वाचा : बिग बींनी थेट प्राजक्ता माळीला लावला व्हिडीओ कॉल; काय झाली चर्चा? पाहा
यावेळी ललितनं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ''काढायचा का दुसरा भाग? जुळून येती रेशीमगाठी (नाम तो सुना होगा)''. त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी नानातऱ्हेच्या कमेंट्स केल्या आहेत.
एका नेटकऱ्यानं लिहिलंय, ''खरंच काढणार असाल दुसरा भाग तरचं बोला. उगाच खोटी आशा नकोय. बाकी ती लाजरी, सालस मेघना आणि तो समंजस आणि तितकाच गुड लूकिंग आदित्य अजून ही आवडतात आम्हाला.''
तर दुसऱ्या एका युझरनं लिहिलंय की, ''पाचवीत असताना क्लासेसवरुन आल्यावर आजी-आजोबासोबत जेवताना वाटायचं की मी आदित्य देसाई आहे आणि भावी भविष्यात माझीही मेघनासारखी गर्लफ्रेंड किंवा बायको असेल'' अजून एका नेटकऱ्यानं लिहिलंय की, ''खरतर आवडेल आम्हला परत एकदा बघायला एकत्र तुम्हा दोघांना. तर काढा नवीन भाग जुळून येती रेशीमगाठी 2. I love it मेघना and आदित्य carecter''