के.एल राहुलच्या स्वप्नातल्या `राणी`चा बोल्ड लूक, तिला पाहून तुम्हीही म्हणाल...
तिला पाहून तुम्हीही म्हणाल...
मुंबई : बऱ्याच काळापासून बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर के एल राहुल यांच्या अफेअर्सच्या चर्चा सुरु आहेत. त्यांच्या डेटिंगच्या बातम्या बर्याच जुन्या झाल्या आहेत पण आतापर्यंत अथिया आणि राहुल दोघांनीही या नात्यावर अधिकृत घोषणा केलेली नाही. अथिया कायम स्वतःचे बोल्ड आणि हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
सोशल मीडियावर अथियाने शेअर केलेल्या फोटोंवर राहुल कायम कमेंट करत असते. अथिया बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी आहे. हेच कारण आहे अथिया आणि राहुलच्या नात्याची चर्चा कायम रंगलेली असते.
एकदा सुनिलला मुलीच्या नात्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा सुनिल म्हणाला, ''या सगळ्यावर माझ्याकडे कमेंन्ट करायला काहीच नाही.'
सुनील शेट्टीने या प्रश्नावर मौन बाळगणं पसंत केलं. सोशल मीडियावर अथिया आणि के एल राहुल हे दोघंही एकमेकांसोबत पोस्ट शेअर करत असतात.