मुंबई : बॉलिवूडचे हॅन्डसम आणि टॅलेंटेज ज्येष्ठ अभिनेते कबीर बेदी आज आपला ७३ वा जन्मदिवस साजरा करत आहेत. तीन वर्षांपूर्वी याच दिवशी कबीर बेदी यांनी चौथ्यांदा बोहल्यावर चढून अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला होता. कबीर बेदी यांना आपल्या या निर्णयाचा परिणामही भोगावा लागला होता. कारण, याच कारणामुळे त्यांच्या मुलीनं म्हणजेच पूजा बेदी हिनं त्यांना घरातून बाहेरही काढलं होतं. कबीर बेदी यांची चौथी पत्नी परवीन ही पूजा बेदीपेक्षा चार वर्षांनी लहान आहे. परवीन ही मूळ ब्रिटिश अभिनेत्री आणि मॉडल आहे. विवाहापूर्वी परवीन आणि कबीर १० वर्ष लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१६ जानेवारी १९४६ मध्ये जन्मलेल्या कबीर बेदी यांनी बॉलिवूडमध्ये १९७१ मध्ये 'हलचल' या सिनेमातून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. कबीर बेदी यांना त्यांनी निभावलेल्या नकारात्मक भूमिकांमधून ओळखलं जातं. कबीर बेदी यांनी अभिनेत्री रेखा यांच्यासोबत 'खून भरी मांग' या सिनेमात ग्रे भूमिका निभावली होती. 


नकारात्मक भूमिकेत दिसूनही कबीर बेदी त्याकाळी तरुणींच्या गळ्यातील ताईत बनले होते. कच्चे धागे, माँ बहन आणि बीवी, नागिन, डाकू, अशांती, खून भरी मांग, पुलिस पब्लिक, कुर्बान, दिल आशना है, यलगार, दिलवाले, मोहनजोदाडो यांसारख्या सिनेमांत काम केलंय. 



कबीर बेदी यांनी १९६९ मध्ये पहिलं लग्न डान्सर प्रोतिमा बेदी यांच्याशी केलं होतं. प्रोतिमा-कबीर यांना मुलगी पूजा बेदी आणि मुलगा सिद्धार्थ आहे. प्रोतिमा-कबीर वेगळे झाल्यानंतरही त्यांना एकमेकांबद्दल आदर होता. मुलगा सिद्धार्थ यानं आत्महत्या दोघांना खूप दु:ख झालं. त्यानंतर एका दुर्घटनेत प्रोतिमा यांचाही मृत्यू झाला. 


प्रोतिमा यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर कबीर यांचं नाव परवीन बाबी हिच्याशीही जोडलं गेलं. कबीर यांचं नातं ब्रिटन फॅशन डिझायनर सुझान हम्फ्रेस हिच्याशीही जोडलं गेलं. दोघांनी विवाहदेखील केली. सुजान-कबीर यांना एक मुलगा आहे. अॅडम बेदी इंटरनॅशनल मॉडल आहे. हा विवाहदेखील दीर्घकाळ टीकू शकला नाही.


त्यानंतर कबीर बेदी यांनी तिसरा विवाह टीव्ही-रेडिओ प्रेझेंटर निक्की हिच्याशी केला. २००५ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला... आणि त्यानंतर ७० व्या वर्षी कबीर यांनी परवीन हिच्याशी चौथ्यांदा विवाह केला.