परवीन बाबीच्या अंतिम यात्रेत भेटले तिचे तीन्ही प्रेमी, कबीर बेदीने सांगितली `दुख:द कहाणी`
कबीरने डांसर प्रतिमा गुप्तासोबत लग्न केलं पण नंतर त्यांनी परवीनसाठी तिला सोडलं. 80च्या दशकातील हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडल्याचे कबीरने सांगितले आहे
मुंबई : बॉलिवूड अभिनेता कबीर बेदी यांनी आपल्या आगामी संस्मरणमध्ये अभिनेत्री परवीन बाबी यांच्याबरोबरच्या इमोशनल रिलेशनशिपनाबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांनी सांगितल की, परवीनने ब्रेकअप केला होता. कबीरने डांसर प्रतिमा गुप्तासोबत लग्न केलं पण नंतर त्यांनी परवीनसाठी तिला सोडलं. 80च्या दशकातील हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडल्याचे कबीरने सांगितले आहे. चला जाणून घेवुया संपुर्ण कहाणी
कबीर बेदीला वाटायचं की, परवीन मानसिक आरोग्याशी वाईटरित्या झगडत आहे, त्यांना तिची मदत करायची होती पण परवीनने त्यांना असं कधी करु दिलं नाही.
कबीर आजही आठवत त्याचं प्रेम
अलीकडे एका मुलाखतीमध्ये कबीरने त्यांच्या रोमान्सबद्दल सांगितलं की, 'जेन्हा मी एकटा असतो तेव्हा मी मागे वळून पाहतो. मला आमचं प्रेम आणि आवड आठवते.'
कबीरने मान्य केलं, तोही दोषी होता
कबीर म्हणाला, 'ती झगडत होती आणि मलाही ते मला दिसत होतं पण माझा बऱ्याच दिवसांपासून दाबून ठेवलेला राग देखील कधी कधी बाहेर यायचा. मी ती सावली पाहीली आहे ज्यामध्ये परवीनमुळे माझ्या चांगल्या काळात संकट उभी राहिली होती. अर्थातच, त्यात तिचा काहीच त्याचा दोष नव्हता. कदाचित मीही तितकाच दोषी होतो. '
मानसिकरित्या कंटाळली होती
कबीरने पुढे म्हणाला की तो परवीनसोबत डेटिंग करताना मानसिकदृष्ट्या कंटाळला होता आणि लोक त्याला एक भाग्यवान पुरुष समजत होते. जो एका सुंदर स्त्रीपासून दुसर्या सुंदर स्त्रीकडे गेला होता. मात्र, केवळ मीच या रिलेशनशिप्सला चांगलाच समजत होतो.
2005 मध्ये हृदय पिळवून टाकणारी घटना
कबीरच्या म्हणण्यानुसार त्याचा हार्टब्रेक तेव्हा झाला जेव्हा २००५मध्ये परवीन यांच्या निधनाची बातमी आली. त्याचे अनेक अवयव खराब झाले होते आणि त्याचा मृतदेह जुहू येथील फ्लॅटमध्ये सापडला. 70 आणि 80च्या दशकात मेगास्टार असलेल्या परवीनचा मृत्यू दुःखद होता
जेव्हा परवीनचे तीन प्रियकर एकाच ठिकाणी भेटले
कबीरने सांगितलं की कसे परवीनवर प्रेम करणारे तीन व्यक्ती महेश भट्ट, डॅनी डेन्जोंपा आणि स्वत: कबीर कब्रिस्तानमध्ये पोहचले आणि तिच्या डेथबॉडीचे विधी करण्यासाठी कशी मदत केली होती.