मुंबई : आज २०२१ या (New Year 2021) नव्या वर्षाला सुरूवात झाली. नवं वर्ष, नवा संकल्प असं अनेकांच असतं. नव्या वर्षात नवीन काही तरी करायचा प्रत्येकाचा संकल्प असतो. या नव्या संकल्पाला अभिनेत्री वनिता खरातने (Kabir Singh Actress Vanita Kharat) सुरूवात केली आहे. वनिता खरातने वर्षाच्या पहिल्याच दिवशी अतिशय बोल्ड फोटो (Bold Photo)  शेअर केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वनिता खरातने शेअर केलेला हा बोल्ड फोटो फक्त शाब्दिकरित्या बोल्ड नसून तो वैचारिकदृष्ट्या ही बोल्ड आहे. आपल्या वजनाचा न्यूनगंड कुठेही न बाळतगता वनिता खरातने हा फोटो शेअर केला आहे. 


वनिता खरातने इंस्टाग्रामवर हा फोटो शेअर करताना यासोबत एक पोस्टही लिहिली आहे. वनिता म्हणते की,'मला माझ्या प्रतिभेचा अभिमान आहे. माझी आवड, माझा आत्मविश्वास, मला माझ्या शरीरावर अभिमान आहे ... कारण मी मी आहे...!!!



वनिता खरातने एका कॅलेंडरकरता हे फोटोशूट केल्याचं दिसतंय. कारण वनिताच्या फोटोसोबत नवीन वर्षातील जानेवारी महिन्याचं कॅलेंडर असल्याचं कळतंय. वनिता खरातचं हे फोटोशूट फोटोग्राफर तेजस नेरुरकर यांनी केलं आहे. #BodyPositivity असा हॅशटॅग वापरत वनिताने हा फोटो शेअर केला आहे. 



वनिता खरातची लक्षवेधी भूमिका राहिली ती "कबीर सिंग' या सिनेमात. या सिनेमात वनिताने शाहीद कपूरच्या नोकर महिलेची भूमिका साकारली आहे. लोकप्रिय होण्याकरता एक सीनच काफी असतो हे वाक्य वनिताच्या बाबतीत खरं ठरलं आहे. एका सीन करता वनिता भरपूर पळाली पण या सीनने तिला लोकप्रियता मिळवून दिली आहे. तसेच वनिताने 'हास्य जत्रा' या कॉमेडी शोमध्ये देखील धमाल उडवली आहे.