दिसतं तितकं सोपं नाही आई होणं... प्रेग्नंसीबद्दल काजल अग्रवालचं मोठं वक्तव्य
अभिनेत्री काजल अग्रवाल सध्या तिचा प्रेग्नेंसी पीरियड खूप एन्जॉय करत आहे
मुंबई : बॉलिवूड आणि साऊथ अभिनेत्री काजल अग्रवाल सध्या तिचा प्रेग्नेंसी पीरियड खूप एन्जॉय करत आहे. काजल या टप्प्यातील प्रत्येक क्षण अतिशय सुंदरपणे जगताना दिसत आहे. त्याचबरोबर, तिने तिच्या चाहत्यांसोबत याचीच एक झलकही शेअर केली आहे. आता नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान काजलने तिच्या प्रेग्नेंसीबद्दल खुलेपणाने सांगितलं आहे.
तिच्या गरोदरपणाबद्दल बोलताना काजल म्हणाली, ती आणि तिचा पती गौतम किचलू पालकत्व स्वीकारण्यासाठी खूप उत्सुक आहेत. ही एक जबरदस्त भावना आहे. अशा परिस्थितीत मी खूप खुश आणि नर्व्हसही आहे.
एखाद्याचं संगोपन करणं, ही खूप मोठी जबाबदारी असते. मी यासाठी खूप उत्सुक आहे. तसं, ही एक मोठी जबाबदारी आहे कारण हा आमच्यासाठीचा पहिलाच अनुभव आहे. काजल पुढे म्हणाली की, गरोदरपणाचे पहिले तीन महिने खूप कठीण होते. गर्भधारणा ही एक वेगळी अनुभूती असते. या काळात स्त्रीच्या शरीरात खूप बदल होतात.
माझे पहिले तीन महिने खूपच कठीण होते. पण तेही ठीक आहे. मी भरपूर योगासनं केली. पिलेट्स, चालायला जाणं. पौष्टिक आहार घेणं. या सगळ्या गोष्टींची मी खूप यावेळी काळजी घेतली. आता सगळं काही ठीक आहे. काजलने असंही म्हणाली की, गरोदरपणात तिला पती गौतम किचलूसोबत डेटवर जाणं आणि तिच्या जवळच्या लोकांसोबत वेळ घालवणं खूप आवडायचं. अशा परिस्थितीत मला कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवायला आवडतो.