मुंबई : झगमगत्या विश्वात आता स्टारकिड्सची चर्चा तुफान रंगलेली असते. त्यांची एक झलक कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी फोटोग्राफर्स कायम त्यांना फॉलो करत असतात. आता देखील फोटोग्राफर्सनी अभिनेत्री काजोल आणि अभिनेता अजय देवगणची मुलगी न्यासा देवगणला कॅमेऱ्यात कैद केलं. सध्या न्यासाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडीओ पाहून न्यासाला सोशल मीडियावर ट्रोल केल जात आहे. त्यामागे कारण देखील तसचं आहे. न्यासासा फोटोसाठी चाहते आणि फोटोग्राफर्स विचारतात. पण न्यासा कोणाकडेही न पाहाता थेट जावून तिच्या कारमध्ये बसते. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


न्यासाच्या अशा वर्तवणुकीमुळे सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे, तर दुसरीकडे व्हिडीओमध्ये शनाया कपूर आणि खूशी कपूर देखील दिसत आहे. शनाया सर्वांसोबत सेल्फी घेताना दिसत आहे.


सध्या या व्हायरल व्हिडीओची सर्वत्र चर्चा आहे. व्हिडीओ पाहून युजर्स न्यासाला ट्रोल तर शनाया कपूरचं कौतुक करत आहेत. शनायाबद्दल सांगायचं झालं तर ती लवकरचं करण जोहर दिग्दर्शित  'बेधड़क' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.