मुंबई : ९० च्या दशकतील तुमच्या आवडची जोडी कोणती असा प्रश्न विचारला तर कित्येक चाहत्यांचे उत्तर शाहरूख आणि काजोल असे असेल. एककाळ गाजवलेल्या जोडीचे चाहते आजही त्यांच्या प्रेमात आहेत. त्यांनी पहिल्यांदा १९९३ साली 'बाजीगर' चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र स्क्रिन शेअर केली होती. त्यानंतर त्यांनी बॉलिवूडला अनेक हिट चित्रपटं दिली. 'करण-अर्जुन', 'दिलवाले', 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे', 'कुछ कुछ होता है', 'कभी खुशी कभी गम ...', 'माई नेम इज खान' या चित्रपटांमध्ये त्यांनी बाजी मारली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


रिल लाईफमध्ये यशस्वी ठरलेल्या या जोडीला रिअल लाईफमध्येदेखील एकत्र पाहाण्याची चाहत्यांची इच्छा होती. 'जर तुझ लग्न अजय देवगनसोबत झालं नसतं, तर तू शाहरूखसोबत लग्न केलं असतंस का?', असा प्रश्न एका चाहत्याने काजोलला विचारला. त्याच्या या भुवया उंचावणाऱ्या प्रश्नावर तिनेही अगदी तिच्या व्यक्तीमत्वाला साजेसं उत्तर दिलं.


तो प्रपोज करणाऱ्यांपैकी नाही ('isn't the man supposed to be proposing') असं उत्तर देत तिने रिअल लाइफमध्ये तिच्या रिललाईफ हिरोला फारसं प्राधान्य न दिल्याचं पाहायला मिळालं. हा झाला गमतीचा भाग. पण, सेलिब्रिटी वर्तुळात अजय देवगन आणि शाहरुखमध्ये असणारे मतभेद या निमित्ताने चर्चेत आले. त्याहूनही आता कुठे त्यांच्या नात्यातून नाहीसा होणारा दुरावाही अधोरेखित झाला. 


हा प्रश्न-उत्तरांचा खेळ तिने स्वत:च्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. याचा अर्थ चाहते आजही काजोल-शाहरूखच्या जोडीला एकत्र पाहण्यासाठी इच्छूक आहेत. तर अजय आणि कजोल यांच्या लग्नाला २० वर्ष पूर्ण झाली आहेत.


अजय-काजोलने देखील अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. 'यू मी और हम', 'टूनपुर का सुपर हीरो', 'प्यार तो होना ही था', 'राजू चाचा', 'हलचल', 'गुंडाराज', 'दिल क्या करे'. तर आता 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' या चित्रपटाच्या माध्यमातून ते चाहत्यांचे मनोरंजन करणार आहेत.