Kajol And Her Sister Tanish Gifted Her Mother A Bungalow : बॉलिवूड अभिनेत्री काजोल (Kajol) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. काजोल ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. काजोल सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच काजोलनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काजोलनं हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत काजोल, तिची आई तनुजा (Tanuja) आणि बहीण तनिषा (Tanisha) दिसत आहे. या व्हिडीओतून त्या तिघांमधील बॉंडिग पाहायला मिळत आहे. यावेळी काजोल आणि तिची बहीण तनिषानं मिळून त्यांची आई तनुजाला एक मोठी भेट दिली आहे. काजोल आणि तनिषानं मिळून त्यांच्या आईला लोणावळ्यात सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण असा एक बंगला भेट म्हणून दिला आहे. काजोल आणि तनिषानं घेतलेल्या या बंगल्यावर गेल्या आठ महिन्यांपासून काम सुरु होतं. काजोल आणि तनिषानं त्यांच्या आईला बंगल्याविषयी कोणतीही माहिती दिली नव्हती. अचानक हा बंगला पाहिल्यानंतर तनुजा या आश्चर्यचकीत झाल्या. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


काजोल आणि तनिषानं सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओत त्या तिघी गाडीतून उतरताना दिसत आहेत. बंगल्याच्या बाहेर असलेली रीबीन कापतात आणि त्यानंतर बंगल्याचा मेन गेट उघडतात. बंगल्याचा दरवाज उघडल्यानंतर तनुजा या चप्पल काढून घरात जातात आणि पहिले पाया पडतात. 


हेही वाचा : Salman Khan ने वाचवली अब्रु, Priyanka Chopra ने स्वत: केला खुलासा


काजोल आणि तनिषानं भेट म्हणून दिलेल्या या बंगल्याचं संपूर्ण फर्निचर हे सागाच्या लाकडापासून बनलेलं आहे. या व्हिडीओत पाहायला मिळतय की घरात पांढऱ्या रंगाचा पेन्ट देण्यात आला आहे. मुलींनी आईला दिलेली ही भेट पाहून नेटकऱ्यांना आश्चर्यासोबतच आनंदही झाला आहे. त्यांनी या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर कमेंट करत काजोल आणि तनिषाची स्तुती केली आहे. 


काजोल ही नेहमीच तिचं स्पष्ट मत मांडताना दिसली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी काजोल चित्रपटात अभिनेत्यांना तरुणांच्या भूमिका मिळण्यावर वक्तव्य केलं होतं. 'सलान वेंकी' चित्रपटात काजोलनं 24 वर्षीय मुलाच्या आईची भूमिका साकारली आहे. दरम्यान, या आधीही काजोलनं अशा अनेक भूमिका साकारल्या आहेत. एकीकडे काजोल आईच्या भूमिका साकारत असताना तिच्यासोबतचे अभिनेते हे अजूनही तरुण अभिनेत्रींसोबत लव्ह इंट्रेस्टच्या भूमिका साकारताना दिसतात. काजोल म्हणाली की, आजही इंडस्ट्रीत हीरोचं वय वाढत नाही, फक्त अभिनेत्रींचेच कसे वाढते. त्या फक्त त्यांच्या वयाच्या भूमिका करत आहेत.'  


काजोलच्या म्हणण्यानुसार, 'चित्रपटसृष्टी हा व्यवसाय आहे. प्रत्येक हीरोवर इतकी गुंतवणूक केली जाते की चित्रपट हिट होणं ही त्यांच्यावर असलेली मोठी जबाबदारी ठरते आणि कुठेतरी हिरोही नंबर गेममध्ये अडकून पडतात. याबद्दल बोलताना काजोलनं तिचा पती आणि अभिनेता अजय देवगणचे कौतुक केले आणि म्हणाली, 'अजय हा एकमेव अभिनेता आहे जो अभिनयाच्या प्रत्येक जॉनरमध्ये यशस्वी आहे'.