काजोलच्या लेकीची चर्चा काही थांबेना... सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या `त्या` फोटोमुळे न्यासा ट्रोल!
Nysa Devgan Trolled: न्यासा देवगण ही आपल्या हटके लुकसाठी कायमच चर्चेत असते. यावेळी तिची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. यावेळी तिनं लंडनमध्ये हजेरी लावली होती. परंतु आपल्या बोल्ड आऊटफिटमुळे ती पुन्हा एकदा ट्रोल झाली आहे.
Nysa Devgan Bold Outfits Trolled: काजोलची लेक न्यासा देवगण कायमच चर्चेत असते. सोशल मीडियावर तर ती पुरती धुमाकूळ घालत असते. आता चर्चा रंगली आहे ती म्हणजे न्यासा देवगण हिचीच. आपल्या मित्र मैत्रीणींबरोबर ती अनेकदा लंडनवारी करताना दिसते. त्यामुळे तिची सर्वत्र चर्चा रंगत असते. कधी पबमध्ये तर कधी मोठ्या कॉन्सर्टला नाहीतर कुठेतरी व्हेकेशनला ती हजेरी लावत असते. त्यामुळे तिचे सोशल मीडियावर तूफान फोटो हे व्हायरल होता दिसतात यावेळीही तिनं अक्षरक्ष: कहर केला आहे. त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आपल्या मित्रमैत्रीणींसोबत तिनं यावेळी प्रचंड प्रमाणात धमाल उडवून दिली होती. बियॉन्स या जगप्रसिद्ध गायिकेच्या लाईव्ह कान्सर्टला तिनं हजेरी लावली होती. यावेळी तिच्यासोबत तिचा बेस्ट फ्रेंड ऑरीदेखील होता.
न्यासा अनेकदा बोल्ड आऊटफिटमध्ये चर्चेत असते. त्यातून तिच्या हॉट आऊटफिटमध्ये ती अनेकदा ट्रोलही होत असते. तिनंही आपल्या चेहऱ्याची सर्जरी करून घेतली आहे. तेव्हा यावेळी तिनं एका आऊटफिटमध्ये परत एकदा कहर केला आहे. तिचा एक बोल्ड फोटो सध्या चर्चेत आला आहे. यावेळी तिनं हॉट आऊटफिट घेतला होता ज्यात तिचा क्लिवेज दिसत होता परंतु तो तिनं एमोजी लावत लपवण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी हा डीपनेक टॉप आणि त्यामुळे काहीच रिवील होऊ नये म्हणून न्यासा केलेली धडपड पाहून नेटकऱ्यांनी विचित्र कमेंट्स केल्या आहेत. यावेळी तिला पुन्हा नेटकऱ्यांनी ट्रोल केलंय.
हेही वाचा - छत्रपती शिवरायांनी बांधलेला किल्ले रायगड 350 वर्षांपुर्वी कसा दिसत असेल? पाहा चित्रांच्या माध्यमातून...
यावेळी तिला अनेकांनी ट्रोल केलं आहे. यावेळी एकानं लिहिलंय की, अजय साळगावंकर ने आपल्या मुलीला काहीशी जास्त सूट दिलेली आहे. तर एकानं लिहिलंय की, असे आपल्या शरीराचा भाग लपवण्यापेक्षा ड्रेस सांभाळला असता तर बरं झालं असतं. यावेळी या कॉन्सर्टला अजून अनेक मोठमोठी मंडळीही आली होती. यावेळी प्रियंका चोप्रानंही हजेरी लावली होती. यावेळी न्यासा पुन्हा एकदा आपला बेस्ट फ्रेंड ऑरीसोबत स्पॉट झाली होती. त्यामुळे पुन्हा एकदा तिची चर्चा रंगली. आपल्या आईवडिलांपासून दूर न्यासा आपला मी टाईम आणि फ्रेंड लाईफ एन्जॉय करताना दिसते. त्याचसोबत तिच्या आऊटफिटमुळे ट्रोलही होते. सध्याही काहीसे असेच झाले आहे.
मध्यंतरी ती पुन्हा एकदा एका लंडनच्या पार्टीमध्ये स्पॉट झाली होती. त्यातून तेव्हाही तिला ट्रोल करण्यात आले होते. अशावेळी तिच्या हॉट आऊटफिटचीच चर्चा रंगली होती.