मुंबईः आजकाल हिरो आणि हिरोईनच्या फिगरमध्ये खूपच जागरूकता आलेली पाहायला मिळते. परंतु आजही प्लस साईज आणि स्किनीनेसचा बॉलीवूडमध्ये बाऊ केला जातो. त्यातून अनेक अभिनेत्रींना हिणवलेही जाते. सतत त्यांच्या उंचीवरून नाहीतर चेहऱ्याच्या मेकअप तसेच ड्रेसिंग सेन्सवरूनही बोलले जाते. करिना कपूरलाही तिचं वय दिसू लागल्याने आहे खूप टोमणे एकावे लागले ज्यात करिना कपूरची मैत्रीण मलायका अरोराचाही समावेश आहे. सध्या मिस युनिव्हर्स असलेल्या हरनाज सिंधूलाही अनेक टोमणे ऐकावे लागत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या यावरूनच एका प्रसिद्ध अभिनेत्री मोठे वक्तव्य केले आहे. ओटीटीमुळे आता स्टारडम पुर्णतः बदलले आहे. त्यामुळे सध्या शारिरीक रूपापेक्षाही अभिनयाला जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे. याबद्दल अभिनेत्री काजोलने आनंद व्यक्त केला आहे. त्याचसोबत ज्याप्रकारे बॉलीवूडमध्ये झिरो फिगर आणि स्लिमट्रीमच्या चर्चा होतात त्याही अत्यंत चुकीच्या आहेत असं सांगून या प्रकारावर काजोल टीका पण केली आहे. 


एका मुलाखतीत काजोल म्हणाली की, पूर्वी सिनेमा यशस्वी होणं सोपं होतं कारण पूर्वी सिनेमा हॉल हे मनोरंजनाचं एकमेव माध्यम होतं. मात्र आता ओटीटीने सगळं काही बदललं आहे त्यामुळे अनेक चांगले बदल झाल्याचं तिने सांगितलं. या व्यासपीठावरून आजकाल अनेक चांगल्या कलाकारांना चांगल्या संधी प्राप्त होत आहेत, याचाही आनंद असल्याचे काजोलनं सांगितलं. 


यावरच बोलताना पुढे काजोल म्हणाली की, आज ज्या अभिनेत्री 24 इंचची कंबर आणि 36 इंचची छाती या फिगरमध्ये बसत नाहीत त्याही आज सुपरस्टार आहेत. तेव्हा ज्या आवश्यक गोष्टी हव्या असतात त्या नसल्या तरी आज अनेक कलाकार स्टार असल्याचे वक्तव्य काजोलने केले आहे. 


काजोलने अलीकडेच 'गुप्त' चित्रपटाची पंचविसावी एनिव्हर्सरी साजरी केली ज्यात मनीषा कोईराला आणि बॉबी देओल यांनीही मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटाच्या एनिव्हर्सरीनिमित्त मुंबईत एका भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमानिमित्त प्रमुख कलाकार आणि चित्रपट निर्माते राजीव राय उपस्थित होते. काजोल आता अभिनेत्री रेवतीसह आगामी 'सलाम वेंकी' चित्रपटात दिसणार आहे. याचे आधी 'द लास्ट हुर्राह' असे नाव होते.