WORLD CYCLE DAY : कोजोल सायकल चालवताना धपकन तोंडावर पडली आणि...... पाहा व्हीडिओ
जर तुम्ही नाही म्हणत असाल, तर हा व्हीडिओ नक्की पाहा तुमचे मत नक्कीच बदलेल.
मुंबई : सिनेमातील हिरो हिरोईनीला आपण नेहमीच परफेक्ट पाहिले आहे. म्हणजे अगदी त्यांच्या मेकअप पासून ते त्यांच्या कपड्यांपर्यंत ते पूर्ण असतात. त्यांनी केलेल्या प्रत्येक गोष्टींचे आपल्या सारख्या सामान्य लोकांना आचरण करायला आवडते. परंतु तुम्हाला काय वाटते, सिनामातील हिरो आणि हिरोईन खऱ्या आयुष्यात कधी चुकत असतील? किंवा त्यांना कोणत्या कठीण प्रसंगाला तोंड द्यावे लागत नसेल?
जर तुम्ही नाही म्हणत असाल, तर हा व्हीडिओ नक्की पाहा तुमचे मत नक्कीच बदलेल. कारण या व्हीडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काजोल आपल्या सिनेमाचे शुट करत असताना सायकलवरुन तोंडावर जोरात पडली आहे.
3 जूनला वर्ल्ड सायकल दिवस साजरा केला जातो आणि याच कारणामुऴे काजोलने तिचा सायकल चालवतानाचा हा व्हीडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. ज्यावर तिने कॅप्शन टाकले की, 'सगळ्यांना हॅपा सायकल दिवस'. हा व्हीडिओ 'कुछ कुछ होता है' या सिनेमाच्या शुटींग दरम्यानचा आहे.
ज्यामध्ये शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि काजोल (Kajol) सायकल चालवत आहेत आणि सायकल चालवताना काजोलचा तोल जातो आणि ती खूप जोरात तोंडावर पडते. यामुळे तुम्हाला अंदाजा येईल की, या सिने ताऱ्यांनाही शूटींग दरम्यान किती कठीण प्रसंगाला तोंड द्यावे लागते ते.
कोजोलच्या या पोस्टवर करण जोहरनेही कमेंट केली आणि आपल्या सिनेमाच्या शुटींग दरम्यानच्या आठवणींना डोळ्यासमोर आणले. करण जोहरने लिहिले की, 'अरे देवा! मला हा दिवस चांगलाच लक्षात आहे. यानंतर काय झाले हे मी कधी ही विसरु शकत नाही.'