म्हणून `कलंक` सिनेमा माझ्यासाठी खास-करण जोहर
दिग्दर्शक करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शच्या बॅनरखाली अनेक सिनेमे सुपरहीट ठरले आहेत.
मुंबई : दिग्दर्शक करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शच्या बॅनरखाली अनेक सिनेमे सुपरहीट ठरले आहेत. पण करणचा आगामी 'कलंक' सिनेमाचे यश अधीक महत्वपूर्ण नसल्याचे त्याचे म्हणने आहे. या सिनेमाच्या आठवणी त्याचे वडीलांशी संबधीत असल्याचे त्याचे म्हणने आहे. करणच्या सांगण्यानूसार 'वडीलांच्या निधनानंतर मी अत्यंत भावूक झालो होतो. मी कोणत्याही सिनेमाचे शूटिंग करण्यास तयार नव्हतो. धर्मा प्रोडक्शच्या लोकांसोबत फक्त सिनेमाच्या कथेविषयी चर्चा करायचो, शेवटी अभिषेक वर्मन सोबत सिनेमाच्या कथेवर चर्चा केली. तेव्हा मला असे वाटले की अभिषेक सिनेमाला योग्य न्याय देवू शकतात.'
2003 साली आलेल्या 'कल हो ना हो' सिनेमा नंतर 'कलंक' सिनेमाच्या कथेवर करण आणि वडीलांमध्ये अनेक वेळा चर्चा झाल्याचे करणने सांगितले त्याचप्रमाणे त्यांना या कथे विषयी अधिक ज्ञान होते. 'कलंक' सिनेमाची कथा भारत - पाकिस्तानच्या फाळणीवर बेतलेली आहे.
बहुप्रतिक्षीत 'कलंक' सिनमाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी सिनेमातील कलाकारांचे फर्स्ट लुक सोशल मीडियाच्या माध्यमातून जारी करण्यात आले. दिग्दर्शक, निर्माते, कलाकार सिनेमाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत. त्यातच सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. काही तासांतच सिनेमाचा टिझर अनेक चाहत्यांनी पाहिला आहे. आता सोशल मीडिया वर सिनेमाचा टिझर भलताच व्हायरल होताना दिसत आहे. 'कलंक' सिनेमाचा सेट दिग्दर्शक संजय लिला भन्साळींच्या 'पद्मावत' सिनेमाची आठवण करूण देतो.