नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री कल्कि केकलां हीने बॉलिवूडच्या सगळ्या खान्ससोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र शाहरुख खानसाठी तिच्या मनात विशेष स्थान आहे. बॉलिवूडमधल्या कोणत्या खान सोबत काम करण्याची इच्छा असल्याचे विचारतच ती म्हणाली, "मी तिन्ही खान्स सोबत काम करू इच्छिते. पण त्यात शाहरुख खान मला अधिक आवडतो."  ''लहानपणापासूनच शाहरुख माझा क्रश आहे. मी खऱ्या आयुष्यात देखील त्याला अनेकदा भेटली आहे. तो अत्यंत आकर्षक आहे,'' असेही ती म्हणाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवीन कलाकारांमध्ये तिला रणबीर कपूर अधिक चांगला वाटतो. याबद्दल ती म्हणाली, "रणबीर आणि मी 'ये जवानी है दीवानी' या चित्रपटात एकत्र काम केले होते. सहकलाकार म्हणून मला तो अत्यंत भावला. तो एक चांगला कलाकार आहे. त्याचसोबत काम करणे आनंददायी असते." 


कल्कि तिच्या आगामी चित्रपट 'रिवॉन' बद्दल खूप उत्साही आहे. हा चित्रपट ३ नोव्हेंबरला प्रदर्शित होईल. त्याचबरोबर तिचा  'जिया और जिया' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. या चित्रपटात तिच्यासोबत रिचा चड्डा मुख्य भूमिकेत आहे.