`ब्रेकअप करायचा असतो तेव्हा मी दुसऱ्या तरुणासोबत झोपते अन्...`, कल्कीचा धक्कादायक खुलासा, `एकाच वेळी अनेक...`

बॉलिवूड अभिनेत्री कल्की कोचलिनने (Kalki Koechlin) आपण तरुण असताना कशाप्रकारे ब्रेक-अप हाताळायचो याबद्दल खुलासा केला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री कल्की कोचलिनने (Kalki Koechlin) नुकतंच एका मुलाखतीत आपण तरुण असताना कशाप्रकारे ब्रेक-अप हाताळयचो याबद्दल खुलासा केला आहे. 40 वर्षीय अभिनेत्रीने आपल्या भूतकाळातील नात्यांचा उल्लेख करताना क्लीन ब्रेकअप करणं किती महत्त्वाचं आहे हे अधोरेखित केलं. आपल्या तरुणपणीच्या अनुभवांचा उलगडा करताना कल्कीने नातं संपवल्यानंतर येणाऱ्या भावनिक आव्हानांबद्दल सांगितलं. कल्कीने नातं संपल्यानंतर सकारात्मकतेने पुढे जाण्याचं महत्त्वही अधोरेखित केले आहे, आदरपूर्ण आणि स्पष्टपणे झालेला शेवट दोघांनाही अधिक प्रभावीपणे ही जखम बरी करण्यात मदत करतो असं कल्कीने सांगितलं.
कल्की Hauterfly वर अभिनेत्री शेनाझ ट्रेझरीवालाशी संवाद साधला. यावेली ती म्हणाली की, "मला वाटतं क्लीन ब्रेक करणं नक्कीच चांगलं आहे. पण ते खूप कठीण आहे. त्यामुळे, तुम्हाला कधी ब्रेकअप करायचे आहे हे आधी नक्की करा. जेव्हा मी तरुण होते तेव्हा मी एका युक्तीचा अवलंब कत होती. ज्यापैकी एक दुसऱ्या एखाद्यासोबत झोपायचं आणि मग त्याला सांगायचं. त्यानंतर तो स्वत:च माझ्याशी ब्रेकअप करायचा".
कल्कीचं हे विधान अनेक कारणांसाठी चर्चेत आहे. यावेळी कल्कीने एका वेळी अनेक पुरुषांनी डेट करण्यासंबंधीही सांगितलं. आपण आता आई असून, अशा नात्यांमध्ये गुंतण्यासाठी आता वेळ नाही असं कल्कीने सांगितलं आहे. ती म्हणाली की, "मी आता विवाहित असून, एक मूलही आहे. आता मला अशा फालतू गोष्टींसाठी वेळ नाही. कारण आता तर तुम्हाला स्वत:च्या जोडीदाराला भेटण्यासही वेळ नसतो. पण आता जे काही झालं तो भूतकाळ आहे. मला वाटते की तुम्ही तुमच्या नियम आणि सीमांबद्दल ठाम असलं पाहिजे".
तिने भूतकाळातील तिच्या "पॉलिमोरस रिलेशनशिप" म्हणजेच एकापेक्षा जास्त पुरुषाशी प्रेमसंबंध ठेवण्यावरही भाष्य केलं. एखाद्यासाठी मुख्य व्यक्ती असणं, पण तरीही प्रयोग करणं ही यामागे संकल्पना होती. ती म्हणाली की, "मला वाटत नाही की तुम्ही पॉलिमोरस रिलेशनशिपमध्ये तुम्ही खोलवर जाऊ शकता. पण मी अशा लोकांना ओळखते ज्यांनी आयुष्यभर हे सांभाळलं आहे आणि त्यांना मुलंही आहेत. माझ्या आयुष्यातील तो भिन्न काळ होता. मी त्यावेळी फार तरुण होते".
पुढे ती म्हणाली, "माझं सेटल होण्यात रस नसल्याने ते ठीक होतं. आपल्या व्यक्तीशी प्रामाणिक राहणं आणि सोबत प्रयोग करणं हा उद्देश होता. ज्यांनी हे केलं आहे अशा लोकांना मी ओळखते. पण मी आता त्यात दीर्घकाळासाठी गुंतू शकते का? हे मला माहिती नाही".