मुंबई : अभिनेत्री कल्कि कोचलिनने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर मातृत्वाची एक झलक दाखवली आहे. कल्किने वर्ल्ड ब्रेस्टफीडिंग वीकमध्ये खास फोटो शेअर केला आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जगभरात मातृत्व दिवस साजरा केला जातो. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कल्किने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये आपल्या मुलीचा म्हणजे साप्होचा फोटो शेअर केला आहे. साप्हो अतिशय आनंदात दिसत आहे. या फोटोला कल्किने कॅप्शन दिली आहे की, 'ब्रेस्टफी़ड करून आज पूर्ण सहा महिने झाले.' त्या सगळ्या मातांना ब्रेस्टफीडिंगच्या शुभेच्छा कारण त्या अतिशय कठीण पण सुंदर मार्गावर आहेत. 



या फोटोच सगळ्यांकडून कौतुक होत आहे. ब्रेस्ट फीडिंगवर एवढ्या मोकळेपणाने बोलणाऱ्या कल्किचं सगळेच कौतुक करत आहे. राधिका आपटे, सयानी गुप्ता, ताहिरा कश्यप आणि भूमी चावला यांनी या फोटोवर कौतुक केलं आहे.