SRK च्या `पठाण` सिनेमच्या टीझरवर KRK ची टिप्पणी, अशी भविष्यवाणी
सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच केलेल्या या भविष्यवाणीमुळे सिनेमाला मोठा फटका बसणार की फायदा होणार हे महत्वाचं ठरणार
मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान (Shah Rukh Khan) खूप काळानंतर 'पठाण' (Pathan) सिनेमानंतर वापसी करत आहेत. २ मार्च रोजी या सिनेमाचा टीझर लाँच झाला आहे. याची इंटरनेटवर सध्या खूप चर्चा आहे. शाहरूख खानच्या चाहत्यांसाठी खूप आनंदाचा क्षण आहे. (Kamaal R Khan calls Shah Rukh Khan films Disaster gave review )
या दरम्यान कमाल आर खान (केआरके)ने शाहरूख खानच्या 'पठाण' सिनेमाबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे.
महत्वाचं म्हणजे सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच केलेल्या या भविष्यवाणीमुळे सिनेमाला मोठा फटका बसणार की फायदा होणार हे महत्वाचं ठरणार आहे.
शाहरूखला देशाचे स्मरण
केआरकेने शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाबाबत ट्विट केले आहे, ज्यात त्याने लिहिले आहे की, 'आता अक्कीच्या देशभक्तीचे भूत एसआरकेवरही चढले आहे. त्यामुळे आता तो देश वाचवणार आहे.
तुम्ही लोक गंमत करत आहात का? जर शाहरुखला देश वाचवायचा असेल तर त्यांनी थिएटरमध्ये खोटे ज्ञान देण्याऐवजी सीमेवर जाऊन चिनी सैन्याशी लढावे.
केआरकेची सिनेमाबाबत मोठी भविष्यवाणी
केआरकेच्या या ट्विटला उत्तर देताना शाहरुखच्या एका चाहत्याने लिहिले, तू खूप नकारात्मक व्यक्ती आहेस. पठाण रिलीज झाल्यावर तुमचा रिव्ह्यू नकारात्मक असेल पण हा चित्रपट ३०० कोटींचा व्यवसाय करेल.
पुढे त्या ट्विटमध्ये म्हटलंय की, हे सर्व रेकॉर्ड मोडेल. थोडी वाट पहा. याला प्रत्युत्तर म्हणून केआरकेने आणखी एक ट्विट केले.
गेल्या 9 वर्षांपासून हे शाहरुख खानचे भक्त असेच सांगत आहेत. शाहरुख खानवर एकामागून एक संकटे देत आहे. यावेळीही काही वेगळे होणार नाही. 'पठाण' हा देखील त्याच ट्रॅकवर आहे.
या दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोण देखील शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केले आहे. ज्याने यापूर्वी 'वॉर' आणि 'बँग-बँग' सारखे सुपरहिट चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.
'पठाण'चा टीझर पाहून शाहरुख खान या चित्रपटात एजंटच्या भूमिकेत दिसणार असल्याची माहिती आहे. शाहरुखचा हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.