Kamal Haasan Happy Birthday : मैत्री, प्रेम, लग्न, घटस्फोट... या गोष्टी झगमगत्या विश्वातून कायम समोर येत असतात. कलावीश्वात असेही काही सेलिब्रीटी आहेत, ज्यांच्याकडे आज सर्वकाही आहे तरीही ते एकटं आयुष्य जगत आहेत. अशाच सेलिब्रिटींपैकी एक म्हणजे अभिनेते कमल हासन (Kamal Haasan). दाक्षिणात्य आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने एकापेक्षा एक सिनेमे आपल्या नावावर करणाऱ्या कमल हासन यांनी दिग्दर्शक, पटकथा लेखक, निर्माता, पार्श्वगायक यामध्ये देखील मोलाची कामगिरी केली. (Kamal Haasan Happy Birthday)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कमल हासन त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे तर चर्चेत असायचे, पण त्यांचं खासगी आयुष्य देखील कामय चर्चेत राहिलं. कमल यांनी दोन लग्न केली, शिवाय त्यांचे तीन अफेअर देखील तुफान चर्चेत आले. कमल यांच्याकडे आज प्रसिद्धी, संपत्ती सर्व काही आहे. पण तरी देखील कमल आज एकटं आयुष्य जगत आहेत. (kamal haasan family)


कमल हासन यांचं पहिलं लग्न 
रिपोर्ट्सनुसार, कमल हासन पाच महिलांसोबत रिलेशनशिपमध्ये होतं. कमल हासन यांनी 1970 च्या दशकात अभिनेत्री श्रीविद्यासोबत काही सिनेमांमध्ये काम केले यादरम्यान कमल हासन आणि श्रीविद्या यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या मात्र, त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. यानंतर कमल हासन यांनी 1978 मध्ये वाणी गणपतीशी लग्न केले आणि 10 वर्षानंतर दोघेही वेगळे झाले.


अक्षराने दिली खासगी आयुष्यात दखल 
वाणीपासून घटस्फोट घेतल्यानंतर कमल हासन यांचं नाव अभिनेत्री सारिकासोबत जोडलं गेलं. रिपोर्ट्सनुसार, कमल हासन - सारिका लग्नाआधीच एका मुलीचे पालक झाले. तिचं नाव आहे अभिनेत्री श्रृती हसन.  (kamal haasan wife)


श्रृती हासनच्या लग्नानंतर कमल आणि सारिका यांनी लग्न केलं, लग्नानंतर कमल हासन आणि सारिका यांची दुसरी मुलगी अक्षरा हासनचा जन्म झाला. (kamal haasan and shruti hassan) कमल हासन आणि सारिकाचे नातेही फार काळ टिकले नाही आणि 2004 मध्ये दोघेही विभक्त झाले. (kamal haasan life story)


22 वर्ष लहान अभिनेत्रीला केलं डेट!
लग्नाव्यतिरिक्त कमल हासन त्याच्या अफेअर्समुळेही खूप चर्चेत होते. त्यांच्यापेक्षा 22 वर्षांनी लहान असलेल्या सिमरन बग्गासोबतही त्यांचं नाव जोडण्याच आलं. याशिवाय कमल हासन 13 वर्षे अभिनेत्री गौतमीसोबत लिव्ह-इनमध्ये होते आणि 2016 मध्ये वेगळे झाले.