कमल हसनविरोधात १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा
टीवी शो `बिग बॉस` को होस्ट करण्याच्या वादात आलेला अभिनेता कमल हसनच्या अडचणी वाढतांना दिसत आहे.
मुंबई : टीवी शो 'बिग बॉस' को होस्ट करण्याच्या वादात आलेला अभिनेता कमल हसनच्या अड़चणी वाढतांना दिसत आहे. थिया तामिजहगम पक्षाने कमल हसनच्या विरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा आरोप करत नोटीस पाठवली आहे. थिया तामिजहगम पक्षाचे अध्यक्ष कृष्णासामी यांनी टीवी शो 'बिग बॉस'मध्ये झोपडीमध्ये राहणाऱ्या लोकांच्या भावना दुखवल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे कमल हसन आणि बिग बॉसच्या टीमला त्यांनी नोटीस पाठवली आहे.
कृष्णासामी म्हणतात की, नोटीस पाठवल्यानंतर जर ७ दिवसांच्या आत माफी नाही मागितली गेली तर त्यांच्यावर १०० कोटींचा मानहानिसा दावा करण्यात येईल. त्याविरोधात ते कोर्टात जातील. कमल हसन शिवाय गायत्री रघुराम, एंडेमोल शाइन इंडिया मुंबईचे सीईओ दीपक धार आणि चेन्नई, स्टार विजय टीव्हीच्य़ा अजय विद्या सागर यांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे.