...म्हणून रूग्णालयात दाखल होणार कमल हसन
काय आहे कारण?
मुंबई : काही दिवसांपूर्वी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार कमल हसन यांनी कलाक्षेत्रात ६० वर्षे पूर्ण केले आहेत. जगाभरात त्यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. त्यामुळे आपल्या आवडत्या कलाकाराबद्दल जाणून घेण्याची इच्छा प्रत्येक चाहत्याला असते. तर अभिनेते कलम हसन २२ नोव्हेंबर २०१९ रोजी रूग्णालयात दाखल होणार आहेत. ही बातमी समोर येताच सोशल मीडियावर चाहते त्यांच्या तब्येतीबद्दल काळजी व्यक्त करत आहेत.
तर, पायांची सर्जरी करण्याकरता कमल हसन रूग्णालयात दाखल होणार आहेत. २०१६ साली झालेल्या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. ते त्यांत्या चेन्नईच्या ऑफिसमध्ये १८ फूट खाली पडले होते. त्यामुळे त्यांच्या पायाला गंभीर इजा झाली होती.
त्यामुळे उद्या त्यांच्या पायावर सर्जरी करण्यात येणार आहे. कमल हसन यांच्या मक्कल निधी मय्यमच्या कर्यकर्त्यांनी ही माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. साडेतीन वर्षानंतर कमल हासन हे इम्प्लांट काढणार आहेत.
कमल हसन सध्या त्यांच्या आगामी 'इंडियन २' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. 'इंडियन २' हा चित्रपट १९९६ साली आलेल्या 'इंडियन' चित्रपटाचा सिक्वल असणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन एस शंकर करत आहेत
कदाचित 'इंडियन २' हा कमल हसन यांचा शेवटचा चित्रपट असण्याची शक्यता आहे. एका मुलाखतीत त्यांनी अभिनय सोडत असल्याचे सांगितले. राजकारण आणि चित्रपट दोन्ही गोष्टी एकत्र करणे शक्य नसल्याचे ते म्हणाले. त्यांना राजकारणावर लक्ष केंद्रित करायचे आहे. त्यामुळे इंडियन २ हा त्यांचा शेवटचा चित्रपट असू शकतो.