तिसर्या टप्प्यातील पोटाचा कॅन्सर असल्याने दोन वर्षात घेणार जगाचा निरोप - कमाल खानचा ट्विटरवर दावा
सतत वादग्रस्त ट्विट्स आणि बॉलिवूड सेलिब्रिटी, सिनेमांबद्दल चर्चा निर्माण करणारी वक्तव्य करण्यासाठी केआरके प्रसिद्ध आहे. मात्र मंगळवारी ( 3 एप्रिल) रोजी केआरकेने केलेल्या नव्या आणि धक्कादायक खुलाश्यानंतर सोशल मीडिया आणि सिने वर्तुळामध्ये पुन्हा चर्चा रंगली आहे.
मुंबई : सतत वादग्रस्त ट्विट्स आणि बॉलिवूड सेलिब्रिटी, सिनेमांबद्दल चर्चा निर्माण करणारी वक्तव्य करण्यासाठी केआरके प्रसिद्ध आहे. मात्र मंगळवारी ( 3 एप्रिल) रोजी केआरकेने केलेल्या नव्या आणि धक्कादायक खुलाश्यानंतर सोशल मीडिया आणि सिने वर्तुळामध्ये पुन्हा चर्चा रंगली आहे.
केआरकेचा धक्कादायक खुलासा
एका प्रेस रीलिजच्यामाध्यमातून केआरकेने त्याला पोटाचा कॅन्सर असल्याचे म्हटले आहे. 'हा कॅन्सर तिसर्या टप्प्यातील असून मी पुढील 1-2 वर्षच जगू शकेन' असं त्याने स्पष्ट केले आहे.
विचित्र आणि वादग्रस्त ट्विटमुळे सतत केआरके चर्चेचा विषय बनलेला असतो. आता त्याने स्वतः कॅन्सर बाबतची माहिती देताना 'मी कोणाच्याही फोनला उत्तर देणार नाही. उर्वरीत आयुष्य मी कुटुंबीयांसोबत घालवणार आहे. एखादी 'ए' ग्रेड फिल्म निर्मित करण्याची आणि अमिताभ बच्चनसोबत काम करण्याची इच्छा आता माझ्यासोबतच संपणार असल्याचं त्याने म्हटलं आहे.
ट्विटरवर माहिती
काही दिवसांपूर्वी केआरकेचं ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आलं होतं. त्यानंतर केआरकेने 'केआरके बॉक्सऑफिस' हे अधिकृत अकाऊंट बनवले. प्रेस रीलिजप्रमाणेच या अकाऊंटवरूनही त्याने ही माहिती ट्विट केली आहे.