Bollywood Queen Kangana Ranaut : बॉलीवूडची 'क्वीन' कंगना राणौत ही तिच्या बिनधास्त विधानांसाठी नेहमीच चर्चेत असते. अनेकदा ती बॉलिवूडमधील कलाकांरा थेट निशाना साधते. ती सोशल मीडियावर ही चांगलीच सक्रिय असते. हल्ली तिला राजकीय वर्तुळात ही पाहायला मिळत आहे. ती नेहमीच राजकीय मुद्द्यांवर आपली मतं मांडत असते. अनेकदा तिच्या या विधानांमुळे ती अडचणीत येते हाच प्रकार दीड वर्षापूर्वी घडला त्यामुळे कंगनाची सोशल मीडियावरुन हकालपट्टी केली. आता, इलॉन मस्कच्या पुनरागमनामुळे, कंगना लवकरच साइटवर परत येईल अशा अनेक बातम्या आहेत. या पुनरागमनापूर्वीच कंगना राणौतने फोटो शेअरिंग साइट इन्स्टाग्रामबद्दल बरेच काही सांगितले आहे. (Kangana breaks up with Instagram What exactly happened nz)


हे ही वाचा - प्रियांका चोप्रानं घालवला लेकीसोबत क्वलिटी टाईम... पाहिलेत का Photo



नेमकं प्रकरण आहे तरी काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंगना राणौतला मे २०२१ मध्ये ट्विटरच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल सोशल नेटवर्किंग साइटवरून कंगनाचे ट्विटर अकाउंट कायमचे बॅन करण्यात आले होते. इलॉन मस्कने ट्विटरचा ताबा घेतल्यापासून, लवकरच कंगना देखील या साइटवर परत येऊ शकते अशा बातम्या येत आहेत.


हे ही वाचा - रणबीर कपूरच्या एक्स गर्लफ्रेंडमध्ये रंगणार स्पर्धा; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?



अभिनेत्रीचा इन्स्टाग्रामवर गोंधळ 


कंगना राणौत अद्याप ट्विटरवर परतली नसून या अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवरही गोंधळ घातला आहे. काही दिवसांपूर्वी कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले होते- 'डंब इंस्टाग्राम हे फक्त चित्रांबद्दल असते, आपण आपले मन लिहितो, ते एका दिवसात गायब होते, इतर सर्वांप्रमाणेच. अस्थिर, कुरूप व्यक्ती. स्वतःच्या बोलण्यावर विश्वास नसल्यामुळे आधी काय लिहिलंय ते बघायचं नाही अशी व्यक्ती. अशा स्थितीत तो लिखित मजकूर नाहीसा झाला तर बरे.'


कंगना पुढे लिहिते- 'पण त्या लोकांचे काय, जे ते जे काही लिहितात त्यावर विश्वास ठेवतात. आम्ही असे लोक आहोत ज्यांना आमच्या शब्दांचे दस्तऐवजीकरण करायचे आहे जे आमचे ऐकतात, जे आमच्या शब्दांनी चांगले संभाषण सुरू करतात. हे छोटे ब्लॉग आहेत जे एखाद्या विशिष्ट विषयाच्या विकासासाठी वापरले जाऊ शकतात.


 



 


हे ही वाचा - 'राम तेरी गंगा मैली' चित्रपटातील अभिनेत्रीने केला त्या सीनवर खुलासा... इतक्या वर्षांनंतर नेमकं काय घडलं



 लवकरच ट्विटरवर पुनरागमन


कंगनाचे ट्विटर अकाऊंट तिला कधी परत मिळू शकते याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती नाही. अभिनेत्री देखील या उडत्या बातम्या इंस्टाग्रामवर पुन्हा शेअर करत असते. लवकरच ती ट्विटरवर पुनरागमन करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.