मुंबई : बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे सिनेमाच्या कमाईतील काही हिस्सा घेतात.  यामध्ये शाहरूख सलमान, आमिर आणि अक्षय कुमार सारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. हे असे स्टार्स आहेत ज्यांचे सिनेमे चालण्यासाठी फक्त नावच पुरेसं आहे. मात्र अशी मागणी बॉलिवूडमध्ये जर कुणी लीडिंग लेडी करत असेल तर लोकं तिला वेडं ठरवतात. मात्र याला अपवाद ठरली आहे बॉलिवूडची 'क्विन' कंगना रानावत. मणिकर्णिका आणि मेंटल हे क्या या सिनेमांकरता तिने हिस्सा मागितला आहे. 


तीन सिनेमे झाले फ्लॉप 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्यांदाच कुणी बॉलिवूड कलाकाराने अशी मागणी केलेली नाही. या अगोदर प्रियंका चोप्राने 'स्काय इज पिंक' च्या सह निर्माता शोनाली बोस यांच्याकडे कमाईच्या प्रॉफिट शेअरची मागणी केली होती. तर कंगनाने ही मागणी यासाठी केली कारण तिचे गेले तिन्ही सिनेमे हे चांगल्याप्रकारे आपटले आहेत. यामध्ये रंगून, सिमरन आणि कट्टी बट्टी या तिन्ही सिनेमांचा समावेश आहे. 



राजकुमार रावसोबत कंगनाचा 'मेंटल है क्या' या सिनेमाचं पोस्टर रिलीज झालं आहे. चाहते देखील याला अतिशय पसंद करत आहे. मणिकर्णिका या सिनेमाचा टीझर 15 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. मात्र अद्याप सिनेमाची रिलीज डेट समोर आलेली नाही