नवी दिल्ली : कंगनाने मुंबई, महाराष्ट्र तसंच मुंबई पोलिसांबाबत केलेल्या वक्तव्यावर विविध माध्यमांतून तिच्यावर टीका होताना दिसते आहे. यात बॉलिवूडकरही मागे नसून अनेक सेलिब्रिटींनी कंगनाला चांगलंच सुनावलं आहे. आता पुन्हा एकदा बॉलिवूड अभिनेत्री नगमाने कंगनावर टीका केली आहे. कंगना महाराष्ट्र आणि मुंबईला बदनाम करत असल्याचं ट्विट नगमाने केलं आहे. नगमाचं हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंगनाने नेमोटिझमपासून सुरुवात करुन नंतर इनसायडर वर्सेस आऊटसायडर आणि आता मुंबईला पीओके म्हटलं आहे. जगभरात मुंबई आणि महाराष्ट्राचं नाव खराब करण्याच काम कंगना करतेय. ती बॉलिवूडला बदनाम करत आहे, असं नगमाने ट्विट केलं आहे. 



दरम्यान, मुंबई महापालिकेने कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केली. कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकाम दाखवत पालिकेने त्यावर हातोडा चालवला. कंगना मुंबईत दाखल झाली असून विमानतळावरुन ती थेट तिच्या घरी पोहोचली आहे. Y प्लस सुरक्षेत कंगना विमानतळावरुन आपल्या खार येथील घरी आली आहे. घरी आल्यानंतरही कंगनाने एक व्हिडिओ ट्विट करत, 'आज माझं घरं तुटलंय, उद्या तुमचा अंहकार तुटेल.' असं म्हणत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना आव्हान दिलं आहे.