साऊथ चित्रपटातील अभिनेत्री आणि राजकारणात उच्च स्थानावर आपले नाव कोरलेल्या जयललीता यांच्या आयुष्यावर बायोपिक साकारण्याची तयारी सुरू आहे. तर जयललीता यांचे व्यक्तिमत्व बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणौत साकारणार आहे. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललीता यांचे व्यक्तिमत्व साकारण्यासाठी कंगणा चक्क 24 कोटी रूपयांचे मानधन स्वीकारणार आहे. कंगणा देशातील सर्वात जास्त मानधन स्वीकारणारी अभिनेत्री ठरली आहे. याआधी अभिनेत्री दीपिका पादुकोनने 'पद्मावत' चित्रपटासाठी 11 कोटी मानधन स्वीकारले होते. सर्वात मानधन घेण्याच्या यादीत दीपिका अव्वल स्थानी होती. पण आता तिची जागा चक्क कंगणाने घेतली आहे. दीपिकाच्या आधी प्रियंका चोप्रा बॉलिवूडची सर्वात जास्त मानधन स्वीकारणारी अभिनत्री होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांनी सांगितल्यानूसार, चित्रपट दोन भाषांमध्ये चित्रित करण्यात येणार आहे. चित्रपटाचे नाव तामिळमधून 'थलाईवा' तर हिंदीमधून 'जया' असे ठरविण्यात आले. जयललीता यांच्या यशोगाथेवर बेतलेल्या चित्रपटासाठी कंगणाने अधिकृतरित्या होकार दिला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन एएल विजय करणार असून जो केवी विजयेंद्र प्रसाद चित्रपटाचे लेखण करणार आहेत. तर चित्रपटाची निर्मिती विष्णु वर्धन इंदुरी आणि शैलेश आर सिंह करणार आहेत.' तरण आदर्श यांच्या सोबत ट्रेड अॅनलिस्ट  जलापथी गुडेली यांनी सुद्धा या बातमीला दुजोरा दिला आहे.



जयललीतांनी चित्रपटात त्याचप्रमाणे राजकारणात मानाचा तूरा रोवला आहे. त्यांनी तमिळ, तेलगू, कन्नड चित्रपटांमध्ये अनेक भूमिका बजावल्या आहेत. अभिनयासोबतच त्यांनी 1991 ते 2016 पर्यंत तामिळनाडूत मुख्यमंत्री पद भुषविले आहे.