मुंबई : महाराष्ट्र सरकारसोबत वाद झाल्यानंतर आज अभिनेत्री कंगना राणौतने मुंबई सोडली आहे. कंगना सोमवारी सकाळी मनालीला जाण्यासाठी निघाले. यादरम्यान कंगनाने चंदीगडला पोहोचून एक ट्विट केले. यामधून तिने शिवसेनेवर निशाणा साधला आहे. कंगनाने लिहिलं आहे की, मुंबई पहिल्यासारखी सुरक्षित राहिलेली नाही. शिवसेना आता सोनिया सेना झाल्याचं कारण दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंगना राणौतने आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की,'चंदीगडमध्ये उतरताच माझी सुरक्षा फक्त नावासाठी राहिली. लोकं आनंदाने मला शुभेच्छा देत आहे. असं वाटतं यावेळी मी वाचले. एक दिवस असा होता जेव्हा मुंबई मातेच्या छत्रछाये खाली अतिशय सुरक्षित वाटायचं. मात्र आज तो दिवस आहे, जीव वाचला तो दिवस लाखमोलाचा. शिवसेना ते सोनिया सेना होताच मुंबईत दहशतवादी प्रशासनाचा बोलबालाय.'


मुंबईविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर अभिनेत्री Kangana Ranaut  कंगना राणौत हिला अनेक स्तरांतून विरोधाचा सामाना करावा लागला. शिवसेनेकडूनही कंगनावर तिच्या या वक्तव्यासाठी सातत्यानं निशाणा साधण्यात आला. सध्याच्या घडीला हाती आलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वीच मुंबईत आलेल्या कंगनानं पुन्हा एकदा मुंबई सोडल्याचं म्हटलं जात आहे. 


सूत्रांच्या आणि एएनआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार सोमवारी सकाळच्या सुमारास कंगनाला तिच्या मुंबईतील घरातून विमानतळाच्या दिशेनं जाताना पाहायला मिळालं. कंगना नेमकी कुठं चालली आहे, हे अद्यापही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. किंबहुना बी टाऊनच्या या क्वीननंही यासंदर्भातील कोणतीही माहिती अथवा संकेत दिलेले नाहीत. पण, सूत्रांच्या माहितीनुसार ती मनालीच्या दिशेनं रवाना झाली आहे. 


गेल्या बऱ्याच काळापासून महाराष्ट्र शासनाची कंगनाविरोधी भूमिका चर्चेचा विषय ठरत आहे. शिवाय मुंबई पालिका प्रशासनाकडून तिचं घर आणि कार्यालयावरही कारवाई करण्यात आली, परिणामी हा संघर्ष वादग्रस्त वळणावर आल्याचं पाहायला मिळालं.