कंगना पहिल्यांदाच मनालीच्या घरी साजरी करणार दिवाळी
पाहा किती करोडचं आहे हे घर
मुंबई : कंगना रानावत आपल्या आगामी 'पंगा' सिनेमाच्या शुटिंगच्या अगोदर मनालीच्या घरी कुटुंबासोबत आहे. आपल्या नवीन घरात कंगना पहिली दिवाळी साजरी करणार आहे. कंगनाने या घराचं नाव 'कार्तिक निवास' ठेवलं आहे. या घराची किंमत 30 करोड रुपये आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच कंगना अमेरिकेतून परतली आहे. कंगना मणिकर्णिका या सिनेमाचं शुटिंग संपल्यानंतर अमेरिकेत गेली होती.
कंगनाने या सिनेमाचं दिग्दर्शन देखील केलं आहे. त्यामुळे अशी चर्चा आहे की दिग्दर्शकाच्या ठिकाणी कंगनाचं नाव असे. या सिनेमाला सर्वात अगोदर गब्बर इज बॅक या सिनेमाचे दिग्दर्शक कृषने सांभाळलं होतं. पण मधल्या काळात कलाकार दुसऱ्या सिनेमाचं शुटिंग करत होते. तेव्हा कंगनाने हा सिनेमा पूर्ण केला.
निर्माता याचा देखील विचार कर आहेत की, कंगनाला दिग्दर्शनाचं क्रेडिट दिलं जावं. कंगना नऊ नोव्हेंबरला मनालीवरून पुन्हा मुंबईत येणार आहे. आणि मणिकर्णिका सिनेमाला शेवटचा आकार देणार आहे. यानंतर ती पंगा या सिनेमाकरता भोपालला जाणार आहे.