मुंबई : बॉलीवूड क्वीन कंगना रानौत आज आपला ३१वा वाढदिवस साजरा करतेय. अनेकदा बॉलीवूड अभिनेते आणि अभिनेत्री आपला वाढदिवस ग्रँड पार्टी देऊन सेलिब्रेशन करतात. मात्र कंगना मुंबईपासून दूर आपले जन्मगाव असलेल्या मनालीमध्ये वाढदिवस साजरा करतेय. काही दिवसांपूर्वीच कंगनाने मनालीमध्ये घर घेतले. त्यानंतर आपल्या वाढदिवशी कंगनाने खास गिफ्ट स्वत:ला दिलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंगनाने स्वत:ला ३१ झाडे गिफ्ट केलीत. कंगना आपला ३१वा वाढदिवस मनालीमध्ये आपले कुटुंब आणि जवळच्या मित्रपरिवारासोबत साजरा करतेय. कंगनाच्या वाढदिवसाला तिची बहिण रंगोलीने ट्विटर पेजवरुन काही कँडिड फोटो शेअर केलेत. या फोटोजमध्ये कंगना झाडे लावताना दिसतेय. रंगोलीने हा फोटो शेअर करताना म्हटलंय, आपल्या वाढदिवसाला आमच्या क्वीनने हिरवेगार प्लॅनेट तयार केलाय. तुला दीर्घायुषी मिळो. 



 


एका वृत्तपत्राच्या बातमीनुसार कंगनाने आपल्या वाढदिवसाला पियानोही खरेदी केलाय. या वृत्तानुसार, कंगना म्हणाली पियानो शिकणे हे माझ्या लिस्टमध्ये होते. मला क्लासिकल म्युझिक आवडते आणि मी नेहमी याच्या कॉन्सर्टला जाते. यासाठीच मी पियानो खरेदी करण्याचा निर्णय घेतला. पियानो शिकणे कठीण आहे. आतापर्यंत माझे शिक्षक वाजवायचे आणि मी ऐकतेय.