मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने आतापर्यंत जे कमावलं होतं ते तिचं ऑफिस. ज्यावर मुंबई महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामाच्या अंतर्गत कारवाई करण्यात आली. याची नुकसान भरपाई मिळावी म्हणून कंगनाने न्यायालयाने धाव घेतली आहे. उच्च न्यायालयाने २२ सप्टेंबरपर्यंत तारीख पुढे ढकलली आहे. या दरम्यान कंगनाची आई आशा राणौत आपल्या मुलीसोबत खंबीरपणे उभी राहिली आहे. त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही बाळासाहेबांची शिवसेना नाही म्हणत कंगनाच्या आईने शिवसेनेवर टीका केली आहे. महाराष्ट्र सरकारने माझ्या मुलीसोबत चुकीचं केलं आहे. शिवसेना माझ्या मुलीवर अन्याय करत आहे. संपूर्ण भारतातील जनता हे अजिबात खपवून घेणार नाही, असं आशा राणौत यांनी म्हटलं आहे. 


आशा राणौत यांनी म्हटलंय की, जर कंगना चुकीची असती तर संपूर्ण देश तिच्यासोबत नसतो. ही कसली सरकार आहे. माझी मुलगी त्याच जनतेतील एक आहे, तिच्यासोबत एवढा अन्याय का? याला सरकार म्हणतात का? ही बाळासाहेबांची शिवसेना नाहीच आहे. ज्या शिवसेनेला आम्ही लहानपणापासून बघत आलोय. 



माझ्या मुलीने १५ वर्षे मेहनत करून एक-एक पैसे जोडून ऑफिस तयार केलं होतं. आम्ही एक मध्यम कुटुंबातील आहोत. माझ्या मुलीने सत्याची साथ दिली. मी अमित शाह आणि हिमाचल सरकारचे आभार मानते. ज्यांनी माझ्या मुलीला सुरक्षा दिली.