Why Kangana Ranaut Skipped Anant Radhika Wedding : बिझनेसमॅन मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा थाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट हे नुकतेच लग्न बंधनात अडकले. त्यांच्या लग्नाचे कार्यक्रम हे 12 जुलै ते 14 जुलै सुरु होता. या कार्यक्रमात संपूर्ण बॉलिवूडनं हजेरी लावली असं म्हणायला हरकत नाही. पण काही त्यातही काही कलाकारांनी हजेरी लावली नव्हती. त्यात एक खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत देखील आहे. ती देखील त्यांच्या लग्नाच्या कार्यक्रमात दिसली नव्हती. दरम्यान, आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याविषयी खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या कंगना रणौत ही तिचा आगामी चित्रपट 'एमरजेंसी' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. अशात कंगनाला या संबंधीत प्रश्न विचारण्यात आला होता. तर ही मुलाखत कंगनानं सिद्धार्थ कन्ननला दिली होती. या मुलाखतीत कंगनाला तिच्या अंबांनींच्या लग्नाच्या अनुपस्थितीतीवर प्रश्न विचारण्यात आला होता. खरं तर तिला सिद्धार्थ कन्नननं विचारलं की अनंतच्या लग्नात अनुपस्थितीचं कारण तिला निमंत्रण मिळालं नाही हे होतं का? त्यावर उत्तर देत अनंतनं तिला स्वत: निमंत्रण दिलं होतं. मात्र, ती त्याच्या लग्नात सहभागी होऊ शकली नाही कारण तिच्या घरी देखील लग्न होतं. 



कंगना रणौतनं सांगितलं की 'मला अनंत अंबानीचा फोन आला होता. एकतर तो खूप प्रेमळ मुलगा आहे. मला म्हणाली तुम्ही नक्कीच माझ्या लग्नात यालं. मी म्हटलं की माझ्या घरी पण एक लग्न आहे. मुळात ती शूभ तारिख होती. त्यात माझ्या छोट्या भावाचं देखील लग्न होतं. पण तरी सुद्धा मी या सगळ्या कार्यक्रमात किंवा लग्नात न जाणं पसंत करते. पण तरी देखील, मी त्याला शुभेच्छा देते.'


हेही वाचा : कोण आहे करण जोहरच्या जुळ्या मुलांची आई? नेटकऱ्यानं प्रश्न विचारताच दिग्दर्शकानं असं उत्तर दिलं की...


दरम्यान, कंगना रणौत कथितपणे त्या सगळ्या सेलिब्रिटींना ट्रोल केलं आहे. ज्यांनी अनंत आणि राधिकाच्या लग्नात किंवा इतर कार्यक्रमात हजेरी लावली होती. दरम्यान, तिनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती त्यात ती म्हणाली होती की मला कितीही पैसे दिले तरी मी कधीही कोणाच्या लग्नात डान्स करणार नाही. त्यावेळी तिनं तिची तुलना ही बॉलिवूडच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांच्याशी केली होती. त्यांनी कधीच सेलिब्रिटींच्या लग्नात गाणी गायली नाही.