सुशांतच्या वडीलांच्या विधानावर कंगनाचे उत्तर
अभिनेत्री कंगना रानौत आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत
नवी दिल्ली : बॉलीवुड अभिनेता सुशांतसिह राजपूतच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री कंगना रानौत आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. सुशांत संदर्भात तिने धक्कादायक खुलासे केले आहेत. तसेच नेपोटीझ्म आणि काही सेलिब्रिटींवर
निशाणा साधला. सिनेसृष्टीत सहकार्य मिळत नसल्याने सुशांत स्वत:ला कमजोर समजत होता असे त्याच्या वडीलांनी सांगितले होते.
सुशांतच्या घरचे केवळ पैशांशी संदर्भातील गोष्टींकडे लक्ष ठेवून असल्याचे युजर्सचे म्हणणे आहे. त्याच्या घरचे नेपोटीझ्मकडे लक्ष देताना दिसत नाहीत असेही युजर्स म्हणाला. दरम्यान कंगनाची सोशल मीडिया टीम देखील यातील प्रत्येक घटनेवर लक्ष ठेवून आहे. कंगनाच्या अकाऊंटवरुन याला उत्तर देण्यात आलंय. त्याचा वकील देखील योग्य आहे. नेपोटीझ्म, ब्लाईंड आयटम, स्मीयर अभियान आणि कोणाचे मन तोडण हा कायद्याने गुन्हा नाही. त्यामुळे तिला या कोणाला उत्तर द्यायचे नाहीय.
'मुंबई पोलीस स्पष्टपणे पक्षपात करत आहेत. मला चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. पण करण जोहरला नाही. त्याच्या ऐवजी पोलिसांनी त्याच्या मॅनेजरला समन्स पाठवलं. असं का?' साहेबांना त्रास होवू नये का? असा प्रश्न यावेळी तिने उपस्थित केला. कंगनाने ट्विटर अकाऊंटवर #ShameonMumbaiPolice या हॅशटॅगखाली मुंबई पोलिसांना ५ प्रश्न विचारले आहेत.
१. यशराज फिल्मने सुशांत सिंह राजपूतला बॅन का केले?
२. करण जोहरने सुशांतला ट्रायलॉजीचे वचन देऊन सिनेमा ऑनलाईन का टाकला?
३. माफिया मीडियाने सुशांत ड्रगिस्ट, रेपिस्ट असून फ्लॉप अभिनेता असल्याचं का चित्र उभं केलं?
४. रिया चक्रवर्तीने सुशांतच्या कुटुंबियांना त्याच्या आजारपणाबद्दल कधी काही सांगितलं का नाही?
५. सुशांतला काऊन्सिल करायला रियाने त्याच्या कुटुंबियांना न बोलवता महेश भट्ट यांना का बोलावलं?
दरम्यान आणखी एकदा ट्विट करत तिने थेट आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. 'दिग्दर्शक करण जोहर आणि आदित्य ठाकरे एकमेकांचे चांगले मित्र असल्यामुळे अद्याप करणची चौकशी झाली नाही.' सुशांतच्या हत्येची थट्टा करणं थांबवा असं देखील ती ट्विटमध्ये म्हणाली आहे.
दरम्यान सुशांतची आत्महत्यानसून ही हत्या असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर जोर धरू लागल्या आहेत. सध्या पोलील याप्रकरणी चौकशी करत आहेत. एक महिन्यापेक्षा जास्त काळ उलटून गेला तरी हाती काही लागले नसल्यामुळे ही केस पोलिसांऐवजी CBIकडे सोपवण्यात यावी अशी मागणी होत आहे. पण सुशांत आत्महत्येचा तपास योग्य रितीने चालला असून यासाठी सीबीआय चौकशीची गरज नसल्याचे गृहमंत्रालयाने स्पष्ट केलंय.