मुंबई : वादाच्या भोवऱ्यात अडकलेली अभिनेत्री कंगना राणौत शांत होण्याच नाव घेत नाही. न्यायालयाकडून समन्स दिल्यानंतर कंगना सतत सोशल मीडियावरून अनेकांवर निशाणा साधत आहे. सतत आपल्यावर अन्याय झाल्यांच कंगना म्हणते. मुंबई पोलिसांना 'पप्पू सेना' म्हणणाऱ्या कंगनाने आता बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खानवर निशाणा साधला आहे. 


कंगनाने आमिर खानला उद्देशून केलं ट्विट 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंगना राणौतने सोशल मीडियावर असहिष्णुताचा मुद्दा उपस्थित केला आहे. या मुद्दयावरून अनेकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या मुद्यालाच घेऊन कंगनाने पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. या मुद्यावरून कंगनाने अभिनेता आमिर खानवरच निशाणा साधला आहे. 


कंगनाने ट्विट करत म्हटलंय की, जसं राणी लक्ष्मीबाईंचा किल्ला तोडण्यात आलं त्याचप्रमाणे माझं घर देखील तोडण्यात आलं. जसं सावरकरांना त्यांच्या विद्रोहासाठी तुरुंगात डांबण्यात आलं तसंच मला देखील तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला आहे. इंटॉलरन्स गँगकडे जाऊन कुणी तरी विचारा किती कष्ट सहन केलेत त्यांनी या इंटॉलरंट देशात?


या ट्विटमध्ये कंगनाने आमिर खानला टॅग केलं आहे. आमिर खानला हे ट्विट टॅग करण्याचं कारण त्याने देखील या मुद्यावर काही दिवसांपूर्वी आपले विचार मांडले होते. एवढंच नव्हे तर आमिर एकदा असं देखील म्हणाला आहे की, त्याला या देशात भीती वाटते. कंगनाने याच वक्तव्याचा आधार घेत आमिर खानला प्रश्न विचारले आहेत.