कंगना रणौतच्या मागे दिसणाऱ्या `त्या` बिचाऱ्या मुलीवर हात उचलणं चुकीचं नाही? अभिनेत्यानंच उपस्थित केला प्रश्न
![कंगना रणौतच्या मागे दिसणाऱ्या 'त्या' बिचाऱ्या मुलीवर हात उचलणं चुकीचं नाही? अभिनेत्यानंच उपस्थित केला प्रश्न कंगना रणौतच्या मागे दिसणाऱ्या 'त्या' बिचाऱ्या मुलीवर हात उचलणं चुकीचं नाही? अभिनेत्यानंच उपस्थित केला प्रश्न](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_500x286/public/2024/06/08/749979-kangana-ranaut-slapped-case-an-actor-asked-slapping-women-behind-her-is-fine.jpg?itok=Ov2WokpJ)
Kangana Ranaut : कंगना रणौतला कानशिलात लगावल्या प्रकरणात तिच्या मागे असलेल्या महिलेवर हात उचलणं योग्य आहे का? अभिनेत्यानं विचारला प्रश्न
Kangana Ranaut : बॉलिवूज अभिनेत्री कंगना रणौतनं लोकसभा निवडणूकीत बाजी मारली. त्यानंतर दिल्लीच्या पार्लिमेंटमध्ये पहिल्यांदा जाणार होती. त्यासाठी ती हिमाचलवरून निघाली होती. जात असताना चंडीगढ विमानतळावर सिक्योरिटी चेकिंग दरम्यान, CISF महिला जवाननं तिला कानशिलात लगावली. त्यानंतर ही बातमी आगेसारखी पसरली. या घटनेनंतर त्या महिलेचा देखील व्हिडीओ समोर आला होता. त्यात ती कंगनाच्या एका वक्तव्यावरून नारीज व्यक्त केली. दरम्यान, कंगनाचा देखील एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओत कंगनासोबत असलेली व्यक्ती विमानतळावरील एका स्टाफला कानशिलात लगावताना दिसली. त्यानंतर अभिनेत्यानं त्यावर प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर नेटकऱ्यांनी देखील तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
कमाल आर खाननं हा व्हिडीओ शेअर करत त्यावर प्रश्न उपस्थित केला. केआरकेनं त्याच्या आधीच्या ट्विटर अकाऊंट म्हणजेच आताच्या X अकाऊंटवरून चंडीगढ विमानतळावरचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यासोबत त्यानं लिहिलं की 'जर सीआयएसएफच्या मुलीनं कंगनाला कानशिलात लगावनं चुकीचं होतं तर सगळ्यांसमोर कंगनाच्या या साइड किकनं त्या बिचाऱ्या महिलेला मारणं चुकीचं नाही का? फक्त कंगनाच सन्मानाची अधिकारी आहे? या बिचाऱ्या मुलीचा या सन्मानावर हक्क नाही का?'
या पोस्टवर जिथे काही लोकांनी केआरकेला ट्रोल केलं. तर काही लोकांनी या व्हिडीओत त्या महिलेला कानशिलात लगावणाऱ्या महिलेला अटक करण्याची मागणी केली आहे. तर एका नेटकऱ्यानं म्हटलं आहे की 'या व्यक्तीनं जे काही केलं ते पूर्णपणे चुकीचं आहे. त्याला शिक्षा मिळायला हवी आणि रीहॅबमध्ये पाठवायला हवं.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'प्रत्येक व्यक्तीला सन्मान मिळायला हवा, त्याला देखील लगेच शिक्षा मिळायला हवी.' केआरकेनं या पोस्टमध्ये लिहिलं की 'डियर तापसी, तुला तुझा थप्पड 2 हा चित्रपट पुन्हा सुरु करायला हवी आणि कुलविंदर कौरची भूमिका साकारायला हवी. माझा विश्वास आहे हा चित्रपट नक्कीच ब्लॉकबस्टर होणार.' केआरकेनं केलेल्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत अनेक गोष्टी सुनावल्या आहेत.
हेही वाचा : कंगना रणौतला कानशिलात लगावणाऱ्या महिलेला मिळणार 1 लाखांचं बक्षीस? उद्योजकानं केली घोषणा
दरम्यान, सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देत केआरकेला ट्रोल केलं आहे. तर काही नेटकऱ्यांनी कंगनाला. इतकंच नाही तर काही लोकांनी कंगनाला कानशिलात लगावणाऱ्या महिलेचं कौतुक केलं आहे. त्यात एका बिझनेसमॅननं त्या महिलेला कंगनाच्या कानशिलात लगावल्या प्रकरणी 1 लाख रुपये बझीस जाहिर केलं आहे.