मुंबईः बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत सध्या तिच्या आगामी 'धाकड' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. यादरम्यानच तिची धाडसी आणि बिनधास्त वक्तव्यही करताना ऐकायला मिळत आहेत. अलीकडेच कंगनाने स्टारकिड्सच्या लूकची खिल्ली उडवली आणि नंतर बॉलीवूडवरही राग काढला होता आता कंगनाने असं विधान केलंय की त्याचीही जोरदार चर्चा होतेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंगना रोज एक वादग्रस्त विधान करताना दिसत आहे.आता नुकतेच कंगनाने आणखी एक मोठं वक्तव्य केलं आहे. कंगनाने म्हटले आहे की, असा एकही बॉलिवूड स्टार नाही ज्याला ती घरी बोलावू शकते. 



एका मुलाखतीत कंगनाला विचारण्यात आले की ती बॉलीवूडमधील कोणत्या तीन लोकांना रविवारच्या ब्रंचसाठी आमंत्रित करेल. त्यावर कंगना म्हणाली की, असं बॉलिवूडमध्ये कोणीही नाही ज्याला घरी बोलावता येईल, बाहेर कुठेतरी भेटायला हरकत नाही, पण घरी कोणाला बोलवता येणार नाही.


या मुलाखतीदरम्यान कंगनाला विचारण्यात आलं की, इंडस्ट्रीत तिचा एकही गायक मित्र नाहीत का? यावर तिनं उत्तर दिले- नाही, अजिबात नाही. हे लोक माझे मित्र होण्याच्या लायकीचे नाहीत. माझा मित्र होण्यासाठी पात्रता आवश्यक आहे. कंगनाच्या या विधानाने तिला पाठिंबा देणाऱ्यांना नक्कीच धक्का बसू शकतो, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.



कंगनाने तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सांगितले होते की, तिच्यासोबत चित्रपटात काम केलेल्या लोकांनी बॉलिवूडमधून बहिष्कार टाकण्याचा धोका पत्करला आहे. त्याने सांगितले की अर्जुन हा फार कमी अभिनेत्यांपैकी एक आहे ज्यांना त्याच्यासोबत काम करायचे होते. तसेच, कंगनाने सांगितले की तिच्या चित्रपटासाठी कास्टिंग ही एक मोठी समस्या होती.