लाल किल्ल्यावर कंगना करणार रावण दहन; 50 वर्षांचा इतिहास बदलणार!
Ravana effigy to be burnt on Dussehra: बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत नेहमी विविध कारणांमुळं चर्चेत असते. यावेळी कंगना 50 वर्षांची प्रथा बदलणार आहे.
Ravana effigy to be burnt on Dussehra: आज देशभरात मोठ्या उत्साहात दसरा साजरा केला जात आहे. विजयादशमीच्या दिवशी अनेक ठिकाणी रावण दहन केले जाते आणि वाईटावर चांगल्याचा विजय झाल्याचा संकेत यामधून दिला जातो. दसऱ्याच्या दिवशी रावणदहनाबरोबरच दिल्लीतल लव कुश रामलीलादेखील नेहमी चर्चेत असते. मात्र, यंदाच्या विजयादशमीला नवा इतिहास घडताना दिसणार आहे. कारण पहिल्यांदाच एका महिलेच्या हातून रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात येणार आहे. तर, लवकुश मैदानात रावणाचे दहन करणारी महिला ही दुसरी तिसरी कोणी नसून बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौट आहे.
कंगना रणौट सध्या तिचा आगामी चित्रपट तेजसच्या निमित्ताने चर्चेत आहे. कंगना व चित्रपटाच्या टिमकडून मोठ्या प्रमाणात चित्रपटाचे प्रमोशन करण्यात येत आहे. अशातच कंगनाने आणखी एक माहिती दिली आहे. दिल्लीतील लव-कुश मैदानातील रावण दहनासंदर्भात खुद्द कंगना राणावतने माहिती दिली आहे. तिने तिच्या अधिकृत अकाउंटवरु एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात लवकुश मैदानात स्वतःच्या हाताने रावण दहन करणार असल्याचं म्हणताना दिसत आहे.
व्हिडिओत अभिनेत्री कंगनाने तिच्या चित्रपटाचे प्रमोशनदेखील केले आहे. व्हिडिओ पोस्ट करताना तिने कॅप्शनमध्ये लिहलं आहे की, लाल किल्ल्यावर दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाच्या 50 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडत आहे. एक महिला रावणाच्या पुतळ्याचे दहन करणार आहे. जय श्री राम, असं कंगनाने म्हटलं आहे. सोशल मीडियावर कंगना रणौटचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. अनेक जण कंगनाच्या व्हिडिओवर कमेंट करताना प्रतिक्रिया देत आहेत.
कंगनाने म्हटलं आहे की, 24 ऑक्टोबर रोजी लाल किल्ल्या आयोजित रामलीलामध्ये मी सहभागी होणार आहे. मी फक्त सहभागीच होणार नाहीये तर रावण दहनदेखील करणार आहे. वाईटावर चांगल्याचा विजय स्थापित करणार आहे, असं तिने म्हटलं आहे.
कंगना रणौटचा तेजस चित्रपट 27 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कंगनाने एअरफॉर्स पायलटची भूमिका साकारली आहे. त्यानंतर कंगनाचा आणखी एक चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे नाव इमरजन्सी आहे. खरं तर याच वर्षी या चित्रपट प्रदर्शित होणार होता .मात्र आता पुढच्या वर्षी चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होईल.