मुंबई : बॉलिवूडची क्विन कंगना राणावत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एक्स बॉयफ्रेंड आणि अभिनेता ऋतिक रोशनसोबतचा ई-मेलवरील वाद कंगनाने उकरून काढला. एवढंच नाही तर आदित्य पंचोली आणि महिला आयोगावर देखील ते भरभरून बोलली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र कंगना अजून एका गोष्टीवर बोलणं टाळते आणि ती म्हणजे अजून एका लग्न झालेला अभिनेत्यासोबत तिचं असलेलं अफेअर. धक्का बसला ना? पण हे खरं आहे. २००९ -१० ची गोष्ट. कंगनाकडे तेव्हा "गँगस्टर", "लाइफ इन ए मेट्रो", "फॅशन" सारखे सिनेमे होते. मात्र तिला तेव्हा कोणता मोठा रोल मिळालाही नव्हता आणि कोणतेही मोठे बॅनर नव्हते. त्यानंतर अचानक तिला "वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई" हा सिनेमा मिळाला आणि तिच्या अपोझिटमध्ये अभिनेता अजय देवगन होता. 


सिनेमाच्या शुटिंग दरम्यान दोघांनी बराच काळ एकत्र वेळ काढला. एवढंच काय तर ही जवळीक एवढी वाढली की "रास्कल" आणि "तेज" सारख्या सिनेमांसाठी त्याने दिग्दर्शकाकडे कंगनाचे नाव सुचवले. सुत्रांच्या माहितीनुसार, अजय कंगनाला प्रत्येक सकाळी घरातून पिक करत असे आणि तिच्यासोबतच सेटवर येत असतं. एकत्र जेवण करून दोघं एकत्र घरी देखील निघाल्याचे सांगण्यात आले. मात्र कथानकात जसा ट्विस्ट असतो तसाच ट्विस्ट या दोघांच्या नात्यात देखील आला. कंगना या नात्याला घेऊन खूप इमोशनल झाली. तेव्हा तिला अजयकडून कमिटमेंट हवी होती. 


मात्र आपलं लग्न झालं असून आपल्याला दोन मुलं आहे हे कारण त्याने पुढे केलं. पण कंगना काही केल्या ऐकत नव्हती. एवढंच काय तर सुत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार, एका रात्री कंगनाने एवढी दारू प्यायली होती की तिला स्वतःच्या पायावर नीट उभ देखील राहता येत नव्हतं. पण ती अजयचे तेव्हा काहीच ऐकायला तयार नव्हती.  त्या ठिकाणी हंगामा करून अजय देवगनला लग्नासाठी विनंती करत होती. त्यावेळीच आपण या प्रकरणातून बाहेर पडलं पाहिजे असा निर्णय अजय देवगनने घेतला. आणि त्यानंतर तो कंगनासोबत कोणत्याच इव्हेंटमध्ये किंवा सिनेमाच्या प्रमोशनमध्ये दिसला नाही.