मुंबई : महाराष्ट्र सरकार आणि कंगना रणौत यांच्यातील शाब्दिक युद्ध अजूनही कमी झालेलं नाही. बीएमसीने कंगनाच्या मुंबई स्थित ऑफिसवर कारवाई केल्यानंतर आता कंगना महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेऊ शकते. कंगना संध्याकाळी ४ च्या सुमारास राज्यपालांची भेट घेऊ शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंगनाने मुंबईला पीओके म्हटल्यानंतर तिच्यावर अनेकांनी टीका केली. पण तिने असं ट्विट का केलं याबाबतची तिची बाजू ती राज्यपालांपुढे मांडणार आहे. कंगनाच्या ऑफिसवर कारवाईनंतर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी बीएमसीची ही कारवाई योग्य नसल्याचं म्हटलं होतं.


कंगनाच्या ऑफिसमध्ये अनधिकृत बांधकाम असल्याचं सांगत तिच्या ऑफिसवर हातोडा चालवण्यात आला होता. कंगनाने यानंतर उच्च न्यायालयात धाव घेतली. कंगनाने या कारवाईनंतर ही सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती.